उसाच्या शेतात आढळलेले बछडे Sakal
पुणे

पुणे : रांजणी येथे ऊसाची तोड सुरू असताना दोन बछडे आढळले

बछडे वनविभागाकडे सुपूर्द

नवनाथ भेके

निरगुडसर - रांजणी, ता. आंबेगाव येथील कार मळ्यात शेतकरी सुनील बबन वाघ व सदाशिव बापू वाघ यांची ऊस तोड सुरू असताना दोन ते अडीच महिन्याचे बछडे आढळून आल्याची घटना रविवार ता.१७ रोजी सकाळी घडली . कारमाळा येथील जुनीविहीर वस्तीत सुनील बबन वाघ व सदाशिव बापू वाघ यांच्या शेतात गेली पाच-सहा दिवसांपासून उसाची तोड सुरू असून रविवारी सकाळी ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये घबराट पसरली.

मुकादम अर्जुन पंढरीनाथ जाधव यांनी कारखाना प्रशासनाला ही माहिती दिल्यानंतर भीमाशंकर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे यांनी घटनास्थळी आले तसेच वनविभागाचे वनपाल विजय वेलकर, वनरक्षक पी. के. पवार, वनमजूर महेश टेमगिरे यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही बिबट बछड्यांना ताब्यात घेतले. हे दोन्ही बछडे अंदाजे दोन अडीच महिन्याचे असून त्यांना अवसरी घाट येथील वनसावित्री उद्यानात सुरक्षितरित्या देखरेखी खाली ठेवले जाणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले सायंकाळी उशिरा पुन्हा त्याच उसाच्या शेतामध्ये बिबट मादी जवळ दोन्ही बछडे सोडण्यात येणार असल्याचे वनरक्षक पी. के. पवार यांनी सांगितले. बिबट बछडे आढळून आल्याने उसतोडणीचे काम थांबवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : MI vs RCB ची तिकीटं मिनिटात विकली गेली... १ लाख रुपयांपर्यंत किंमत...फॅन्स म्हणतात, काहीतरी झोल आहे...

Congress Office: काँग्रेसला मोठा धक्का! दिल्लीतील मुख्यालय खाली करण्याचे सरकारकडून आदेश; मोठा राजकीय वाद उभा राहणार?

LPG Supply Crisis In India : एलपीजी संकटात केंद्राचा मोठा निर्णय ! PNG कनेक्शन लवकर मिळणार; आता गॅस पाईपलाइनसाठी येणार नाही अडथळा

गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! अडकलेले पैसे लवकर परत मिळणार; महायुती सरकारकडून MPID कायद्यात मोठा बदल

कोमेजली म्हणून मी ती फुलं कचऱ्यात टाकली... नम्रता संभेरावने सांगितला मुलाचा भावुक किस्सा; म्हणाली- त्याने पाहिलं आणि...

SCROLL FOR NEXT