Two corona positive defendants escaped from the temporary prison 
पुणे

धक्कादायक! तात्पुरत्या कारागृहातून दोन कोरोना पॉझिटीव्ह आरोपी पळाले

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या आरोपींवर उपचार करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून दोन आरोपींनी धूम ठोकली आहे. काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास पळून गेलेले हे दोन्ही आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनिल विठ्ठल वेताळ (वय 21, रा. गणेश नगर,  भीमा कोरेगाव, शिरूर) आणि विशाल रामधन खरात (रा.फातिमा मज्जित समोर, श्री समर्थ हौसिंग सोसायटी, घर नं 5, निगडी ) अशी पळून गेलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी आहेत. वेताळ याच्यावर शिक्रापूर पोलिस ठाण्यात मारहाण करून जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे.  तर खरात याच्यावर चिखली पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कच्या आणि पक्क्या कैद्यांसाठी कारागृह प्रशासनाच्यावतीने तात्पुरत्या कारागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. त्या या आरोपींवर उपचार केले जातात. न्यायालयीन कोठडीत असलेल्या तात्पुरत्या कारागृहाच्या बिल्डिंग क्र 104, पहिला मजला येथील खोली क्रमांक एकमध्ये कोरोनावर उपचार घेत असताना दोघे पळून गेले आहेत. या पूर्वीही कारागृहातून आरोपी पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असताना दोघा आरोपींच्या पालायनायनाने कारागृह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास येरवडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बलभीम ननवरे करित आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, सख्ख्या भाच्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; महापालिकेच्या रिंगणात उतरणार

Nagpur Theft : नागपूरमध्ये डिलिव्हरी बॉयकडून महागडे पार्सल लंपास; २२.३४ लाखांचा अपहार; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

31st December Trip: लांब कुठं न जाता, मनोरीमध्ये 31 डिसेंबरचा परफेक्ट प्लॅन करा आणि निसर्गरम्य न्यू इअरचा अनुभव घ्या!

Amravati Crime : किरकोळ वादातून डोकं दगडानं ठेचलं, बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात १७ वर्षीय तरुणाची हत्या; २ अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

Kurpalच्या शेतकऱ्याची भन्नाट आयडिया! बिबट्याला रोखण्यासाठी बियरच्या बाटल्यांचं अनोखं ‘जुगाड’ | Walva News | Sakal News

SCROLL FOR NEXT