पुणे

पुणे : वाघोलीतील दोघांचे कोरोना रिपोर्ट्स निगेटिव्ह; रुग्णालयातून डिस्चार्ज

नीलेश कांकरिया

वाघोली : वाघोलीतील चार कोरोनाबाधित रुग्णांपैकी दोन जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी  घरी सोडण्यात आले. तर तिसऱ्या रुग्णांचा पहिला चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. चौथ्या रुग्णांचा पहिला चाचणी अहवाल आज दुपारपर्यंत येईल.

15 एप्रिल रोजी वाघोलीत पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर चार दिवसात तीन रुग्ण आढळून आले. या चारही रुग्णांच्या कुटुंबीयांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तर त्यांच्या संपर्कातील 21 जणांना इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करण्यात आले होते. तिघांवर खाजगी रुग्णालयात तर एकावर नायडू रुग्णालयात उपचार सुरू होते. चौघांचीही प्रकृती स्थिर होती. 21 जणांचा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्याने त्यांनाही घरी सोडण्यात आले. चारपैकी दोघांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने गुरुवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वाघेश्वर मंदिर चौकात फुलांची उधळण करत व टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर दोघांनीही वाघेश्वर मंदिरात जाऊन मुख्य मंदिराच्या बंद दरवाजातून दर्शन घेतले. त्यांच्या स्वागतासाठी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. नागरिकांनी घरीच रहावे व कोरोनाला हरवावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केले.

वाघोली जातोय ग्रीन झोनच्या दिशेने...

वाघोली ग्रीन झोनच्या दिशेने जात असून, लवकरच कोरोनामुक्त होईल. नागरिकांनी घरीच राहावे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार काळजी घ्यावी. कोणालाही काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

- डॉ. वर्षा गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली.

ससून रुग्णालयाच्या परिचारिका अर्चना दुबे यांनी दोन आठवडे ससून रुग्णालयात कोव्हिड 19 रुग्णांची सेवा केली. यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाईन रहावे लागले. बुधवारी रात्री त्या वाघोलीतील राहत्या सोसायटीमध्ये परतल्यानंतर सोसायटीधारकांनी फुलांचा वर्षाव करत टाळ्या व थाळ्या वाजवून उत्साहात स्वागत केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT