Sopan Dighe sakal
पुणे

Nirgudsar Accident : भरधाव पिकअप गाडीच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

पिकअप गाडीने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नागापूर-वळती (ता.आंबेगाव) रस्त्यावर मीना नदी पुलाजवळ कोळीफाटा येथे घडली.

नवनाथ भेके

निरगुडसर - भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप गाडीने रस्त्यावरील दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नागापूर-वळती (ता.आंबेगाव) रस्त्यावर मीना नदी पुलाजवळ कोळीफाटा येथे सोमवार (ता. २९) रोजी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

यामध्ये दुचाकीस्वार सोपान एकनाथ दिघे (वय-३३) रा. वळती व सोबत असणाऱ्या ओळख न पटलेली अज्ञात व्यक्ती अशा एकूण दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या पिकअप गाडी चालक अभिषेक खंडू जाधव (रा. वळती) यावर पारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नागापूर (ता. आंबेगाव) येथील कोळी फाट्यावर असणाऱ्या रस्त्यावर सोमवारी रात्री सव्वा आठ वाजण्याची सुमारास पारगाव येथून आपल्या कामावरून सोपान दिघे हे घरी वळती या ठिकाणी जात होते. त्यांच्या सोबत दुचाकीवर एक अज्ञात व्यक्तीही बसलेला होता.

पुलाच्या जवळ काही अंतरावर असताना पाठीमागून मंचर बाजूकडून येणारी पिकअप गाडी (नंबर एम एच १४ के क्यू ८०७९) या गाडीने सोपान एकनाथ दिघे हे जात असलेल्या (एम एच १४ आर ३४९७) या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

त्यामध्ये पिकअप गाडीने त्या दोघांमधील एकाला शंभर फूट अंतरावर फरफटत नेले. या अपघातामध्ये सोपान दिघे यांच्या डोक्याला व खांद्यास तसेच अनोळखी व्यक्तीच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याबाबतची खबर पारगाव पोलिस ठाण्यात निलेश एकनाथ दिघे यांनी दिली असून पुढील तपास पारगाव पोलिस करत आहे.

मृत्यू झालेल्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटेना

वळती (ता. आंबेगाव) येथील सोपान दिघे हे पारगाव येथील फरशीच्या दुकानात काम करतात. ते दुकानातून घरी जाताना एकटेच निघालेच होते.परंतु अपघात झाल्या ठिकाणी त्यांचा दुचाकीवर एक अज्ञात व्यक्ती बसलेला होता.

यामध्ये त्या अज्ञात व्यक्तीचाही मृत्यू झाला. या व्यक्तीचा फोटो पोलिसांनी परिसरातील अनेक गावात पाठवला. परंतु या व्यक्तीची काही ओळख पटलेली नाही. त्यामुळे दिघे यांनी अज्ञात प्रवाशाला लिफ्ट दिली असल्याचा अंदाज व्यक्त होत असून, यात त्याचा जीव गेला आहे. अशा दोघांच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT