Two died in different Accident In pune 
पुणे

टेम्पोचा वेग बाईकस्वाराला भोवला, वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे : वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालविल्याने झालेल्या दोन स्वतंत्र अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात टेम्पो आणि ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिल्या अपघातात दुचाकीस्वार राजेंद्र महादेव मोरे (वय 55 रा. दत्तविहार इमारत शेजारी, येवलेवाडी) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी ऋतिक शंकर केंगार (वय 19, रा. दत्त मंदिरामागे, बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. तर प्रवीण पिसे (वय 32, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 26) बिबवेवाडीतील शेळके वस्तीमधील सार्वजनिक रस्त्यावर ऋतिक हा भरधाव वेगाने टेम्पो घेऊन निघाला होता. टेम्पो चालवत तो चंदन मार्बल शेजारील रस्त्यावर आला असताना त्याने मोरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मोरे यांचा मृत्यू झाला. तर या अपघातात मंगेश सोळंकी यांच्या रिक्षाचे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. या अपघाताची घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. त्यातून अपघाताची भीषणता स्पष्ट होते. 

घर, पैसा असलेले लोकही फक्त 10 हजारांसाठी झालेत फेरीवाले!

दुसऱ्या प्रकरणात ट्रकच्या धडकेत अज्ञान व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार प्रकाश साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात 16 डिसेंबर रोजी नवले पुलाकडून कात्रज चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर राजमाता भुयारी उद्यानाजवळ घडला होता. मृत्यू झालेल्या व्यक्तीची आणि धडक देणाऱ्या ट्रकचालकाची माहिती पोलिस शोधत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

Pune Bengaluru Highway: गणपती बाप्पांना निरोप अन् परतीच्या प्रवासात कोंडी! आनेवाडी टोलवर ५ किमी वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT