two girls refuse to live with their Parents in Baramati
two girls refuse to live with their Parents in Baramati sakal
पुणे

बारामतीत दोन मुलींचा आई वडीलांसोबत राहण्यास नकार....

मिलिंद संगई, बारामती.

आठवीत शिकणा-या दोन मुली इतर मुलांशी बोलल्यावर आई वडील रागावतात, या कारणावरून दुस-या वेळेस गायब झाल्या

बारामती - शहरातील इयत्ता आठवीत शिकणा-या दोन मुली इतर मुलांशी बोलल्यावर आई वडील रागावतात, या कारणावरून दुस-या वेळेस गायब झाल्या. बारामती शहर पोलिसांनी त्यांना माळेगाव येथे एका ऊसाच्या शेतात लपून बसलेले असताना ताब्यात घेतले. या नंतरही आई-वडीलांसोबत न राहण्यावर या मुली ठाम राहिल्याने पोलिसांपुढेच पेच निर्माण झाला होता, अखेर त्यांना बाल सुधारगृहात पाठविण्यात आले.

पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत माहिती दिली. यापूर्वीही या मुली घरातून काहीही न सांगता निघून गेल्या होत्या. पोलिसांनी त्यांचा शोध घेत त्यांना आई-वडीलांच्या स्वाधीन केले होते. शुक्रवारी (ता. 8) पुन्हा त्या बेपत्ता झाल्या. पोलिसांनी शोधाशोध सुरु केली असता त्या माळेगाव येथे ऊसाच्या शेतात सापडल्या. त्यांना पोलिस ठाण्यात आणत आई-वडीलांना बोलावून घेण्यात आले. परंतु आई-वडीलांसमक्ष त्यांनी त्यांच्याकडे जाण्यास साफ नकार दिला. या अल्पवयीन मुली वारंवार घरातून निघून जात असल्याने त्यांना धोका पोहोचू शकतो हे लक्षात घेत पोलिसांनी या प्रश्नी बालकल्याण समितीला पत्र दिले. त्यानुसार समितीने या मुलींना बालसुधार गृहात ठेवण्याचे आदेश केल्यानंतर त्यांना येथील प्रेरणा शासकिय सुधारगृहात दाखल करण्यात आले.

भीक मागणाऱया मुलांचीही सुधारगृहात पाठवणी....

बारामती शहरात तीन अल्पवयीन भावंडे रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून गुजराण करतात. त्यांची आई त्यांना सोडून गेली आहे तर वडील व्यसनी आहेत. या मुलांना येथे कोणी नातेवाईकही नाहीत. शनिवारी ही मुले पोलिसांना रेल्वे स्थानक परिसरात दिसल्यानंतर त्यांच्या वडीलांकडे सोपवणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने बालकल्याण समितीच्या आदेशाने त्यांची सोफिया बालसुधारगृह, पुणे येथे रवानगी कऱण्यात आली.

अवघा चार वर्षाच्या तमिळ मुलाकडून चोरीचा प्रयत्न....

तमिळ भाषा बोलणारा अवघा चार वर्षाचा मुलगा बारामती बस स्थानकात प्रवाशांच्या खिशात हात घालून मोबाईल काढण्याचा प्रयत्न करताना पोलिसांना मिळून आला. त्याला मराठी येत नाही. तो वाममार्गाला लागण्याची शक्यता असल्याने त्यालाही पुण्याला सुधारगृहात पाठवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT