पुणे महापालिका
पुणे महापालिका sakal
पुणे

नवीन मिळकतींमुळे दोनशे कोटींचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या सावटातही फ्लॅट विक्री वाढत असल्याने महापालिकेच्या उत्पन्नात भर पडत आहे. यंदा सात महिन्यांत ३६ हजारपेक्षा जास्त मिळकतींची नोंदणी मिळकतकर विभागाकडे झाली आहे. यातून महापालिकेला १९५ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. यंदा गतवर्षीचा विक्रम मोडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्न घटल्याने विकासकामांवर परिणाम झाला. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना मिळकतकर भरण्यासाठी आवाहन केले होते. त्यास पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याने पहिल्या तीन महिन्यांत ८४६ कोटी रुपये जमा झाले होते. गतवर्षीपेक्षा हे उत्पन्न जास्त होते.

जुन्या मिळकतींची वसुली करण्याकडे महापालिका प्रशासनाचा भर असला तरी त्याच बरोबरीने नव्याने बांधकाम झालेल्या मिळकतींना कर लावून वसूल करण्यासाठीही यंत्रणा काम करत आहे. मिळकतकर विभागाकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर पथक नियुक्त केले आहे. २०१९-२० पासून नव्याने मिळकतींची नोंदणी होण्याचे प्रमाण वाढले असून, २०१९-२० मध्ये ३८ हजार ९६८ मिळकतींची नोंद झाली होती. २०२०-२१ मध्ये सर्वाधिक ४७ हजार ६६६ मिळकतींची नोंदणी झाली असून त्यामाध्यमातून २१५ कोटी ७६ लाखाचे उत्पन्न मिळाले. २०१९-२० पूर्वी सरासरी २५ हजार मिळकतींचीच नोंदणी होत होती. अनेक इमारतींना कर लावलेला नसल्याचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत होते.

२०२१-२२ मध्ये शहराला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला, पण शासनाकडून मुद्रांक शुल्काची देण्यात आलेली सवलत, गृहकर्जाचा कमी झालेला व्याजदर व कमी झालेले दर यामुळे नागरिकांनी घर खरेदीस प्रतिसाद दिला. १ एप्रिल ते २९ ऑक्टोबर पर्यंत महापालिकेकडे ३६ हजार ८६६ नव्या मिळकतींची नोंद झाली आहे. यातून १९५ कोटी ३७ लाखाच्या उत्पन्नाची भर पडली आहे. तसेच अनेक फ्लॅट विक्रीला गेले असले तरी अद्याप त्यांची नोंद पालिकेकडे झालेली नाही. भविष्यात ती नोंद होणार असल्याने यंदाच्या वर्षी गेल्यावर्षी पेक्षा जास्त नव्या मिळकतींची नोंद होणार आहे.

‘‘गेल्यावर्षी ४७ हजार ६६६ नव्या मिळकतींची नोंद झाली होती, यंदा ऑक्टोबरपर्यंत ३६ हजार ८६६ मिळकतींची नोंद झाली आहे. हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी आणखी पाच महिने असल्याने विक्रमी मिळकतींची नोंद होईल. तसेच नव्याने विकल्या गेलेल्या फ्लॅटची पुढील काळात नोंद वाढण्याची शक्यता आहे.’’
- विलास कानडे, प्रमुख, मिळकतकर विभाग

गेल्या १० वर्षातील मिळकत नोंदणी
वर्ष - मिळकतसंख्या - उत्पन्न (कोटीमध्ये)
२०१२-१३ - ३२२२५ -९९.८१
२०१३-१४ - ३१५२५ - ९७.९३
२०१४-१५ - २३२६४ - ९७.६१
२०१५-१६ - २५५२८ - ११९.३०
२०१६-१७ - २८८८५ - १३७.५८
२०१७-१८ - २७१०४ - १५१.३३
२०१८-१९ - २४२५५ - १३०.२८
२०१९-२० - ३८९६८ - १८५.०६
२०२०-२१ - ४७६६६ २१५.७६
२०२१-२२ (ऑक्टोबर)- ३६८६६ - १९५.३७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT