Leopard sakal
पुणे

Leopard : तारेच्या सापळ्यामध्ये अडकलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची वन विभाग व रेस्क्यू पथकाने केली सुटका

गवारमळा हा संपूर्ण डोंगराळ परिसर आहे या परिसरात नेहमीच नागरिकांना बिबट्या, सांबर, कोल्हे, लांडगे, तरस, मोर, ससे आदी वन्य प्राण्यांचे दर्शन होत असते.

सुदाम बिडकर

पारगाव - मेंगडेवाडी, ता. आंबेगाव येथील गवारमळा येथे वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी अज्ञात व्यक्तीने लावलेल्या तारेच्या सापळ्यामध्ये बिबट्याचे सात ते आठ महिन्याचे दोन बछडे अडकल्याची माहिती समजताच वन विभागाचे कर्मचारी व रेस्क्यू पथकाच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या शर्थीने दोन्ही बछड्यांची सुरक्षीतरीत्या सुटका करून ताब्यात घेऊन तपासणीसाठी अवसरी - पेठ घाट वन उद्यानात पाठवले आहे.

येथील गवारमळा हा संपूर्ण डोंगराळ परिसर आहे या परिसरात नेहमीच नागरिकांना बिबट्या, सांबर, कोल्हे, लांडगे, तरस, मोर, ससे आदी वन्य प्राण्यांचे दर्शन होत असते. या परिसरात अनेक वेळा बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला करून ठार मारलेले आहे.

आज शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास या परिसरात तील पोपट मुक्ताजी गवारी यांच्या शेताच्या बाजूला अज्ञात व्यक्तींनी वन्य प्राणी किंवा सदस्यांची शिकार करण्यासाठी सापळा लावला होता. त्या सापळ्यामध्ये सुमारे सात ते आठ महिन्याचे बिबट्याचे दोन बछडे अडकले होते. ही माहिती सोपान दत्तू गवारी यांनी तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.

वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या सूचनेवरून वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक बी. एच. पोत्रे, वनरक्षक सी.एस. शिवचरण, ऋषी कोकणे, वनमजूर दशरथ मेंगडे, अरुण खंडागळे, संपत भोर, शरद जाधव, रेस्क्यू टीम सदस्य जयेश शहा, डॉ. अतुल साबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ऋषी कोकणे यांनी मोठ्या शर्थीने रेस्क्यू टीम सदस्य व कर्मचाऱ्यांच्या मदतीने बछड्यांना तारेच्या सापळ्यातून सुरक्षितरीत्या बाहेर काढून ताब्यात घेऊन अवसरी-पेठ घाट वन उद्यान येथे पशुवैद्यकामार्फत तपासणीसाठी घेऊन गेले आहेत.

या परिसरात यापूर्वी एका ज्येष्ठ नागरिकावर तरसाने हल्ला केला होता तर एकदा सांबर विहिरीत पडले होते, बिबट्यांच्या होणाऱ्या हल्ल्यामुळे या परिसरात पाळीव कुत्र्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राणी असल्याचे निदर्शनास येते त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी संजय गोरे, विशाल गवारी यांनी केली आहे.

या दोन्ही बछड्यांची तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करून त्यांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असून, या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार घटनास्थळाजवळ पिंजरा बसविण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT