Arrested Sakal
पुणे

साधूचा वेश परिधान करून महिलांची मंगळसूत्र चोरणारे दोन जण जाळ्यात

अल्पवयीन मुलांचाही समावेश

डी. के वळसे पाटील

मंचर - साधूच्या वेशात फिरून महिलांना बोलण्यात गुंतवून ठेवून किंवा जागृत देवीचा अंगारा आहे असे भासवून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पळून जाणाऱ्या दोन साधूंना मंचर पोलिसांनी सापळा रचून सोमवार, (ता. 13) रोजी ताब्यात घेतले आहे.

आनंद जालिंदर चव्हाण (वय 18) व एक अल्पवयीन मुलगा (दोघे मूळ रा.ओझर ता. जामनेर, जि जळगाव, सध्या रा. राजगुरुनगर नवीन पुलाजवळ, ता. खेड, जि. पुणे सदर आरोपींच्या विरोधात घोडेगाव पोलिस ठाण्यात मंगळवार (ता 7) सुमन चंद्रकांत अंकुश (ढाकाळे, तां. आंबेगाव) या महिलेचे ४५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरुन नेल्याचा गुन्हा दाखल असल्याने त्यांना मंचर पोलिसांनी घोडेगाव पोलिसांकडे सुपूर्त केले आहे. घोडेगाव पोलिसांनी चव्हाणलाअटक केली आहे.

शिरदाळे (ता.आंबेगाव )येथे दोन संशयित भगवे कपडे घालून फिरत आहेत अशी माहिती मोबाईल द्वारे निवृत्‍ती तुकाराम तांबे, संतोष बजरंग तांबे यांनी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांना दिली. होडगर यांनी ताबडतोब पोलीस हवालदार टी.एस हगवणे, पोलीस शिपाई एस बी मोमीन, जी एस येळवंडे यांना शिरदाळे येथे पाठवले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेऊन मंचर पोलीस ठाण्यात आणले. घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढाकाळे येथे अंकुश या महिलेला अंगारा देऊन हातचलाखीने तिचे मंगळसूत्र काढून नेल्याची कबुली चोरट्यांनी मंचरपोलीसा समोर दीली आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले.पोलिसांनी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व पोलीस पथकाकडे आरोपींना सुपूर्त केले. सदर आरोपी चा तपास घोडेगाव पोलीस करत आहेत.

"साधूच्या वेशात आरोपी असल्यामुळे त्यांच्याविषयी कोणालाही संशय येत नव्हता. अंगावर भगवी वस्त्र, कानात बाळ्या, कपाळावर गंध यामुळे त्यांचा संशय कोणाला येत नव्हता. शिरदाळे ग्रामस्थांनी सतर्कता दाखवल्यामुळे या आरोपींना पकडणे शक्य झाले आहे. अजून काही चोरीचे गुन्हे त्उघड होण्याची शक्यता आहे"

- जीवन माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक, घोडेगाव पोलीस ठाणे, ता. आंबेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT