सोमवार पेठेतील शाळेतून दोन मुली बेपत्ता sakal
पुणे

Pune Crime : सोमवार पेठेतील शाळेतून दोन मुली बेपत्ता; समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

घरातून शाळेत निघाल्याचे सांगून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचा प्रकार सोमवार पेठेतील एका शाळेच्या परिसरात घडला. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : घरातून शाळेत निघाल्याचे सांगून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचा प्रकार सोमवार पेठेतील एका शाळेच्या परिसरात घडला. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेतील एका शाळेत या दोन मुली शिकतात. त्या दोघींचे वय १४ वर्षे असून, त्या मंगळवारी (ता. १) सकाळी शाळेत जातो, असे सांगून घरातून बाहेर पडल्या. परंतु त्या शाळेत पोचल्या नाहीत. त्या दोघींना शाळेच्या परिसरात प्राचार्यांनी पाहिले. त्यावेळी त्यांनी मुलींना शाळेत जाण्यास सांगितले.

परंतु त्या शाळेत गेल्या नाहीत. त्यांचा दिवसभर शोध घेतला. परंतु त्या आढळून न आल्याने पालकांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या दोन्ही मुलींना कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे पालकांनी फिर्यादीत म्हटले आहे. समर्थ पोलिस अल्पवयीन मुलींचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

Maharashtra Live News : सांगोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; 84 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

कॅन्सरशी लढताना मनीषा कोईराला ठरली आधार! सोनाली बेंद्रेने केला मोठा खुलासा, म्हणाली...

Farmers Success: थेंबाथेंबातून फुलविली द्राक्षबाग;अंबेजवळगे येथील सुनीता बिरंजे यांचा जलव्यवस्थापनाचा आदर्श

SCROLL FOR NEXT