corona 
पुणे

भोर तालुक्यातील या गावांमध्ये पुन्हा वाढला कोरोनाचा धोका 

किरण भदे

नसरापूर (पुणे) :  भोर तालुक्याच्या नसरापूर परिसरातील साळवडे व वरवे या गावांमध्ये पुन्हा प्रत्येकी एक रुग्ण नव्याने सापडला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून, राजगड (नसरापूर) पोलिस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत रुग्णांची सख्या पंधरा झाली आहे. त्यामधील चार रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून, एकाच मृत्यु झाला आहे, तर दहा जण उपचार घेत आहेत.

वरवे येथील कंपनीमध्ये भोर तालुक्यातील साळवडे, वरवे खुर्द, खडकी, शिवरे या गावांमधील प्रत्येकी एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर आज साळवडे गावात दुसरा रुग्ण सापडला. संबंधित व्यक्ती पुण्याला कामासाठी ये जा करत होती. या संपर्कामधून त्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. वरवे बुद्रुक येथे एका कुटुंबात पुण्यामधील नातलग महिला काही दिवसांकरिता आली होती. ती परत पुण्यात गेल्यावर तिचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला होता. तिच्या संपर्कात आलेल्यांची चौकशी व तपासणी करताना वरवे बुद्रुक येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. शा प्रकारे दोन नविन रुग्णांची भर आज पडली आहे.

राजगड पोलिस ठाण्याअंतर्गत आतापर्यंत नसरापूरमध्ये अढळलेले दोन रुग्ण पूर्ण बरे झाले असून, रहाटवडे येथे सापडलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे निधन झाले असून, दोन जण पूर्ण बरे झाले आहेत. या बरोबरच साळवडे येथे दोन, वरवे बुद्रुक येथे एक, वरवे खुर्द येथे एक, शिवरे येथे एक, खडकी येथे एक, खेड शिवापूर येथील 4 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या 15 रुग्णांपैकी 10 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तर, चार पूर्ण बरे झाले असून, एकाचे निधन झाले आहे.

उपचार चालु असलेल्या दहा रुग्णांपैकी बहुतेकांच्या कुटुंबियांना काहीच त्रास नाही. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन केले आहे.  फक्त साळवडे येथील एका रुग्णाच्या पाच नातेवाईकांना त्रास जाणवत असल्याने त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यांचा अहवाल उद्या मिळणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT