Two persons injured palace collapsed of wall at Nana Pethe pune 
पुणे

नाना पेठेतील वाड्याची भिंत कोसळून दोघेजण जखमी

अग्निशामक दलाच्या जवानांकडून चौघांची सुखरूप सुटका

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सोमवारी दिवसभर शहरात जोरदार पाऊस झाल्यानंतर रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतील एका वाड्याची भिंत कोसळून दोघेजण गंभीर जखमी झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तत्काळ पोचून भिंतीमध्ये अडकलेल्या जखमी व्यक्तीसह चार जणांना सुखरूप बाहेर काढले.

शहरात रविवारी रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात पाऊस होता. तर रात्री आठ वाजल्यापासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला. दरम्यान, शहरात पावसामुळे झाडपडीच्या १६ घटना दिवसभरात घडल्या. त्यानंतर रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास ३८६, नाना पेठे येथील मॉडर्न बेकरी समोरील एका दुमजली वाड्याची भिंत कोसळली.

त्यामुळे या वाड्यात राहणारे दोघेजण भिंतीमध्ये अडकले. याबाबत अग्निशामक दलास माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच जवान घटनेच्या ठिकाणी दाखल झाले. लाकूड, पत्रे, दगड, माती व चिखल बाजूला काढून अग्निशामक दलाच्या जवानांनी कमलाकर झिंजूर्के (वय ६४), राजेंद्र झिंजूर्के (वय ६०), भारती झिंजूर्के (वय ५०) अशा तिघांना तेथून बाहेर काढले. त्यापैकी दोघानी गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अन्य एकाची सुखरूप सुटका केली.अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर, जवान चंद्रकांत गावडे, मनीष बोंबले , महेंद्र कुलाळ, विठ्ठल शिंदे, चंदकांत मेनसे, दिंगबर बांदिवडेकर, शिर्के व चालक अतुल मोहिते आणि कर्णे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT