Crime News  esakal
पुणे

Crime News: दौंड तालुक्यात घोरपडीच्या शिकारीसाठी आलेल्या दोन शिकाऱ्यांना अटक

या दोघा शिकाऱ्यांनी वनक्षेत्रात एका सशाची शिकार केली

प्रफुल्ल भंडारी

दौंड : गोपाळवाडी (ता. दौंड) येथील वनक्षेत्रात घोरपडीच्या शिकारीसाठी आलेल्या दोन शिकाऱ्यांना वन विभागाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक जिवंत घोरपड जप्त करण्यात आली आहे. या दोघा शिकाऱ्यांनी वनक्षेत्रात एका सशाची शिकार केली.

पुणे जिल्ह्यातील दौंड - कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या गोपाळवाडी येथील राखीव वनक्षेत्र परिसरात दोन इसमांनी एक जिवंत घोरपड पकडल्याची माहिती वन अभ्यासक प्रल्हाद जाधव यांना मिळाली होती. त्यांनी त्याविषयी दौंडचे वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना कळविले. वन विभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविलेल्या शोध मोहिमेत गोरख अंबादास जाधव ( वय ५७ , रा. पोथरे , ता. करमाळा, जि. सोलापूर) व भरत जनार्दन जाधव (वय ३४, रा. पिंपरखेड , ता. आष्टी, जि. बीड) या दोन शिकाऱ्यांना एका जिवंत घोरपडीसह ताब्यात घेण्यात आले. त्यांनी एका सशाची शिकार केल्याचे आढळून आले.

वनक्षेत्रात शिकारीसाठी दोन्ही शिकार्यांनी दोन श्वान, लोखंडी कोयता, लोखंडी गज आणि दोरी सोबत आणले होते. शिकारीसाठी वापरलेली एक दुचाकी देखील जप्त करण्यात आली. संशयित आरोपी गोरख जाधव व भरत जाधव यांच्याविरूध्द वन्यजीव संरक्षण कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्यासह वनरक्षक जी. बी. गवळी, वनपाल एन. सी. चव्हाण, वन कर्मचारी अशोक जाधव, राजू मोरे यांनी या कारवाईत भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

Gold Rate Today: सप्टेंबरअखेर सोनं 11 हजारांनी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात भाव किती?

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याने इमारतीवरून मारली उडी, प्रायव्हेट पार्ट कापलेला; वृंदावनात घटनेने खळबळ!

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT