Two school children drown in farm lake in Dhayri
Two school children drown in farm lake in Dhayri 
पुणे

शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

विठ्ठल तांबे

धायरी - सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथे खंडोबा मंदिराजवळ असणाऱ्या शेत तळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेततळ्यात बुडालेला सुरज शरद सातपुते (वय,१४) पुष्कर गणेश दातखिंडे (वय, १३) दोघेही रा. अभिनव परिसर, नऱ्हे) अशी त्यांची नावे आहेत.

आम्ही तिघे खंडोबा मळा डोंगरावर फिरण्यासाठी गेलो होतो. परत येताना आम्हाला शेततळे दिसले. त्यामध्ये सुरज आणि पुष्कर यांनी पोहण्याची इच्छा व्यक्त केली. मला पोहोता येत नसल्याने मी नको म्हणत असतांना देखील त्यांनी शेततळ्याच्या कठड्यावर कपडे काढून तळ्यात उड्या मारल्या. परंतु तळ्यात पानी १० ते १५ फूट असल्याने त्यांना श्वास देखील घेणे अवघड होत होते. त्यात कठडा कठड्याला प्लास्टिकने आच्छादन असल्याने पाय घसरून पुन्हा पाण्यात बुडत होते. अखेर मी ही माहिती आहुबाजूच्या लोकांना सांगितली असल्याचे त्या त्यातील बचावलेल्या तिसऱ्या मित्र अथर्व चव्हाण (वय १४) रा. नालंदा हायस्कूल, शेजारी, धायरी) यांनी सांगितले. सुरज हा नालंदा शाळेत इयत्ता नववीमध्ये तर पुष्कर हा सातवीमध्ये शिकत आहे. दोघांचे आईवडील एका खाजगी कंपनीत कामाला आहे.

सिंहगड पोलीस आणि अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, धायरी येथील खंडोबा मंदिराजवळ असणाऱ्या रायकर मळ्यातील शेततळ्यात सकाळी ९. ३० वाजण्याच्या सुमारास दोन मुले पाण्यात बुडाल्याची माहिती सिंहगड पोलिसांना मिळाली तात्काळ पोलीस घटनास्थळी जाऊन पाहणी केली. लगेचच पोलिसांनी अग्नीशमन नियंत्रण कक्षास दिली. त्यानंतर तातडीने सनसिटी अग्निशमन केंद्र व पीएमआरडीए अग्निशमन केंद्र येथून दोन वाहने घटनास्थळी दाखल झाली.

अग्निशमन वाहने पोहोचताच गळाच्या दोरखंडाच्या साहाय्याने दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृत देह सिंहगड पोलिसांनी शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सिंहगड पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, प्रमोद वाघमारे ,साह्यक पोलिस निरीक्षक चंदनशिवे, पोलीस उपनिरीक्षक दिपक खेडकर व इतर पोलिस कर्मचारी करत असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"शेततळे खोल असल्याने तळ्यात १० फूट पाणी आसल्याने त्यांना बाहेर येणे अवघड होत होते. कठाडा निसरडा असल्याने बाहेर येणे देखील अवघड असल्याने निष्पाप मुलांचा जीव गेला. ही दुर्दैवी घटना धायरी परिसरात घडली आहे. सर्व पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे"

- प्रमोद वाघमारे, पोलिस निरीक्षक, सिंहगड पोलिस स्टेशन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT