Aarti Khandagale and Priti Khandagale sakal
पुणे

Manchar : मावस बहिणाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

बांद्रा-मुंबईहून खास उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त एकलहरे येथे आलेल्या दोन सख्या बहिणींचा घोडनदीच्या पाण्याच्या पात्रात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

डी. के. वळसे पाटील

मंचर - बांद्रा-मुंबईहून खास उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त एकलहरे (ता. आंबेगाव) येथे आलेल्या आरती श्याम खंडागळे (वय-१८) व प्रीती श्याम खंडागळे (वय-१७, रा. मुंबई) या दोन सख्या बहिणींचा एका बारा वर्षीय मुलीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना घोडनदीच्या पाण्याच्या पात्रात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान बारा वर्षीय मावस बहीण कावेरी बाबासाहेब आरझेंडे हिचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले आहे. सदर घटना गुरुवारी (ता. १) दुपारी घडली. आरती व प्रीती काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे एकलहरे गाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आरती बांद्रा येथे महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षात व प्रीती इयत्ता बारावीत शिकत होती. एकलहरे येथे मामाच्या गावी दहा दिवसांपूर्वी बहिणीच्या व शिवाजीराव ढगे यांच्या कुटुंबातील शिवांश (वय-१) याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आल्या होत्या. बुधवारी (ता. ३१ मे) शिवांशचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्या-त आला. पण ह्या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुखाचे सावट पसरले आहे.

घोडनदीच्या काठावर आरती, प्रीती यांच्यासमवेत कावेरी आरझेंडे, वर्षा नारायण घोरपडे, कुशा नारायण घोरपडे गेल्या होत्या. त्यावेळी कावेरी आरझेंडे हिचा पाय सटकून ती घोडनदीच्या पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी आरती व प्रीती पाण्यात उतरल्या. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मात्र पाय घसरून पडलेली कावेरी हिचा जीव वाचला.

वर्षा व कुशा या सुद्धा पाण्यात उतरल्या होत्या. पण त्या भीतीने माघारी फिरल्या. तेथे असलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्यामुळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष डोके, उपसरपंच दीपक डोके, पोलीस पाटील निखिल गाडे, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल डोके, दीपक जाधव, अक्षय धोत्रे यांनी तातडीने मदतीसाठी आले. पाण्यात बुडलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढून गौरव बारणे यांच्या रुग्णवाहिकेतून मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्या दोघींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT