Pune Accident News Sakal
पुणे

Pune Accident News : अन् आई-वडिलांचे स्वप्न अधुरेच राहिले... पुण्यातील अपघातात लातूरच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

खराडी बायपासजवळ अपघातात मृत्युमुखी पडलेले दोघे विद्यार्थी मूळचे लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील होते.

अनिल सावळे, सकाळ वृत्तसेवा

वाघोली, ता. २८ : खराडी बायपासजवळ अपघातात मृत्युमुखी पडलेले दोघे विद्यार्थी मूळचे लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील होते. वाघोलीतील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकत होते. परीक्षा संपल्याने गावी जाण्यासाठी आदिल मित्रांसमवेत रेल्वे स्टेशनकडे निघाला होता. मात्र, काळाने त्याला आधीच हिरावून नेले. मुलांनी अभियंता व्हावे असे स्वप्न दोघांच्या आई-वडिलांचे होते. त्यासाठी त्यांनी मुलांना शिक्षणासाठी पुण्यात पाठविले होते. मात्र, त्यांचे स्वप्न अधुरेच राहीले.

कौतुक करणाऱ्या भावाची आता भेट नाही

आदिलचे वडील रिक्षा चालवतात, तर आई गृहिणी आहे. मुलाने अभियंता व्हावे, असे त्याच्या आई-वडिलांचे स्वप्न होते. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी त्याला शिक्षणासाठी पुण्यात पाठविले. त्याला एक छोटी बहीण आहे. तिने बारावीला चांगले गुण मिळविल्याने त्याने तिचे व्हाटसॲपवर स्टेटस ठेवले होते. मात्र कौतुक करणाऱ्या भावाची आता भेट होणार नाही, याची तिला पुसटशीही कल्पना आली नसेल.

अफानला रडू कोसळले

फहाद रायसोनी महाविद्यालयात संगणक शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता. तोसुद्धा मंगळवारी दुपारी रेल्वेने गावी जाणार होता. मात्र त्यालाही काळाने हिरावून नेले. फहादच्या गावी मालकीचे मंगल कार्यालय आहे. त्याचे वडील हाच व्यवसाय बघतात. तर आई गृहिणी आहे. त्याला एक छोटा भाऊ आहे. ती इयत्ता पाचवी शिकतो. आदिल, फहाद आणि अफान हे तिघे मित्र एकाच वर्गात शिकत होते. महाविद्यालयाजवळ एकाच सदनिकेत भाड्याने रहात होते. परीक्षा संपल्याने दोघांना गावी जाण्याची ओढ लागली होती, असे सांगताना अफानला रडू कोसळले.

तो झोपला आहे, तुम्ही का रडता?

अपघाताची माहिती मिळताच आदिलचे वडील तातडीने ससून रुग्णालयात आले. त्यांना या घटनेचा मोठा धक्का बसला. इतर नातेवाईक रडत असताना तुम्ही का रडता, तो झोपला आहे. असे इतर नातेवाइकांना ते सांगत होते. त्यांची ही अवस्था पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली.

दाम्पत्याला १६ वर्षांनी अपत्य-

शेख दाम्पत्याला लग्नानंतर १६ वर्षानी फहादच्या रूपाने पहिले अपत्य झाले. ते फहादला जिवापाड जपत होते. त्याचे डिप्लोमापर्यंतचे शिक्षण उदगीरलाच झाले. त्याने शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊ नये, असे त्याच्या आई वडिलांची इच्छा होती. मात्र त्याची इच्छा आणि मित्रांच्या आग्रहामुळे त्याला पुण्यात शिक्षणासाठी पाठविले. नियतीने मात्र १६ वर्षांनी झालेला आणि त्यानंतर २० वर्षे जपलेल्या मुलाला आई-वडिलांपासून हिरावून नेले.

चालकाला कठोर शिक्षा व्हावी

निर्दयी ट्रकचालकाला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नातेवाईक आणि स्थानिक तरुणांनी केली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आदिलची आर्थिक स्थिती हलाखीची होती. तो आई- वडिलांना एकुलता एक होता. या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT