Trinity Academy Team Sakal
पुणे

'ट्रिनिटी'च्या दोन संघांची 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन'साठी निवड

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने होत असलेल्या 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२२'मध्ये ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधील दोन संघांची निवड झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने होत असलेल्या 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२२'मध्ये ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधील दोन संघांची निवड झाली आहे.

कोंढवा - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने होत असलेल्या 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२२'मध्ये ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधील दोन संघांची निवड झाली आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर विभागाच्या अंतिम फेरीत 'ट्रिनिटी ऍकॅडमी' इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि सिव्हिल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी धडक मारली.

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची 'टीम डायनॅमिक्स' व सिव्हिल इंजिनिअरिंगची 'टीम जीआयएस' हे दोन संघ सहभागी होणार आहेत. 'टीम डायनॅमिक्स'मध्ये अमर सय्यद, मंगेश नारखेडे, आर्यन काझी, कविता विश्वकर्मा, नेहा भुजबळ, प्रेरणा चाचर यांचा सहभाग असून, त्यांना 'ई अँड टीसी'च्या विभागप्रमुख दीप्ती कुलकर्णी यांच्यासह दिगंबर जक्कन व सुप्रिया सस्ते मार्गदर्शन करत आहेत. 'टीम जीआयएस'मध्ये ऋतुजा भालेराव, प्रणाली जाधव, विक्रम जगताप, नोमान शेख, सौरव पतंगे, सलोनी धोतकर यांचा समावेश असून, सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सतीश देशमुख व तेजश्री महामुनी मार्गदर्शन करत आहेत. कॉलेजमधून पूर्ण कार्यक्रमाचा सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ,तृप्ती थिटे यांनी या स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले.

काय आहे 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन'?

'टीम डायनॅमिक्स'चा 'ऑटोमॅटिक सन ट्रॅकिंग सोलर पॅनेल माउंटिंग' हा प्रकल्प आहे. प्रकाश उर्जेला विद्युत उर्जेत रूपांतरित करण्यासाठी आणि जास्तीत जास्त प्रमाणात सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी, तसेच याचा वापर नंतर विविध वस्तूंच्या प्रयोगांसाठी केला जाऊ शकणार आहे. 'टीम-जीआयएस'चा प्रकल्प 'आयडेंटिफिकेशन ऑफ लँडस्लाईड ससेप्टीबल झोन्स युजींग जिऑग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टीम' असा असून, त्यातून भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे भूस्खलनाची स्थिती ओळखण्यास मदत होणार आहे. अंतिम फेरी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची रायपूर आणि सिव्हिल इंजिनिअरिंगची गांधीनगरमध्ये २४ ते २६ ऑगस्ट २०२२ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT