Criminal Sharad Mohol Murder Case esakal
पुणे

Pune Crime : गुंड शरद मोहोळ खूनप्रकरणी 16 आरोपींविरुद्ध 2000 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल

गुंड शरद मोहोळचा खून पाच जानेवारी रोजी दुपारी कोथरूड भागातील सुतारदरा भागात झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

या घटनेनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे-सातारा रस्त्यावर (Pune-Satara Road) शिरवळजवळ मोटारीचा पाठलाग करून आठ आरोपींना अटक केली होती.

पुणे : गुंड शरद मोहोळच्या खून प्रकरणात (Criminal Sharad Mohol Murder Case) गुन्हे शाखेने गुरुवारी (ता. २३) विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात १६ आरोपींविरुद्ध दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह इतर आरोपी सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन (Yerwada Central Jail Court) कोठडीत आहेत. गुंड शरद मोहोळचा खून पाच जानेवारी रोजी दुपारी कोथरूड भागातील सुतारदरा भागात झाला होता.

या घटनेनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे-सातारा रस्त्यावर (Pune-Satara Road) शिरवळजवळ मोटारीचा पाठलाग करून आठ आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून तीन पिस्तुलांसह तीन मॅगझीन, पाच काडतुसे आणि दोन मोटारी ताब्यात घेतल्या होत्या. जमिनीच्या आणि आर्थिक वादातून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार याच्यासह साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. त्यानंतर गुन्हे शाखेकडून आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT