पुणे

धायरीत पुर्ववैमनस्यातून दोघांवर कोयत्याने वार, एकाचा जागीच मृत्यू

पांडुरंग सरोदे -सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात पोलिस हवालदाराच्या खुनाची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री धायरी येथे टोळक्‍याने पुर्व वैमनस्यातुन दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास धायरी येथील रायकरमळ्यात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारस घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी एकास अटक केली आहे. अनिकेत उर्फ मोन्या अंकुश पोळेकर (वय 19, रा. रायकरमळा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शाम हरिश्‍चंद्र सोनटक्के (वय 20, रा. जाधवनगर, रायकर मळा, धायरी) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर फिर्यादी योगेश व्यंकटेश चव्हाण (वय. 19, रा.धायरीगाव) हा गंभीर जखमी आहे. या घटनेत पोळेकर याच्यासह पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम सोनटक्के, योगेश चव्हाण व आरोपी अनिकेत पोळेकर हे सर्वजण एकाच परिसरात राहण्यास असल्याने त्यांची एकमेकांशी ओळख होती. दरम्यान, पोळेकर व त्याच्या साथीदारांची आणि शाम, योगेश यांची काही दिवसांपुर्वी भांडणे झाली होती. दरम्यान बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी योगेश हा सोनटक्के व अन्य मित्रांसोबत दारू पिण्यासाठी रायकरमळा येथील एका कंपनीच्या मागील बाजूच्या मोकळ्या जागेत जाणार होते.

त्यावेळी आरोपी पोळेकर हा त्याच्या साथीदारासोबत तेथे आला. तेव्हा, त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली. त्यावेळी पोळेकर फिर्यादी व शामला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यासमवेत आणलेल्या तलवारी व कोयत्याने दोघांवर वार केले. सोनटक्के याचे डोके, गळा व तोंडावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. तसेच योगेश हा देखील जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. पोळेकर यास रात्री उशीरा अटक करून गुरूवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास 10 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास सिंहगड पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT