पुणे

दुचाकीची सीएनजी किट ‘गॅस’वरच

सुधीर साबळे

पिंपरी - दुचाकीच्या सीएनजी किटसाठी अर्थसाह्य देण्याचे बॅंकांनी नाकारल्यामुळे ही योजना फसली आहे. शहरामध्ये १६ लाख दुचाकी असून आतापर्यंत केवळ १५० दुचाकींना हे किट बसविण्यात आले आहे. 

पर्यावरणाचे संवर्धन आणि दुचाकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) सहा महिन्यांपूर्वी दुचाकी वाहनांसाठी सीएनजी कीट बसवण्याची योजना सुरू केली होती. पंधरा हजार रुपयांचे हे किट बॅंकेच्या अर्थसाह्यातून उपलब्ध करून देण्याचा उपक्रम होता. पहिल्या पाच हजार गाड्यांना कीटसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज एमएनजीएलकडून देण्यात येणार होते. मात्र, संबंधित बॅंकेने अर्थसाह्याची रक्‍कम किरकोळ असल्यामुळे या योजनेतून काढता पाय घेतला. 

दरम्यान, एमएनजीएलने आतापर्यंत यासाठी अनेक बॅंकांबरोबर चर्चा केली. मात्र, कोणीही त्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद तांबेकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

सीएनजी किटला मोठी मागणी
पिंपरी-चिंचवड परिसरातील भोसरी, चिंचवड औद्योगिक पट्ट्यात काम करणाऱ्या अनेकांनी आपल्या दुचाकीला हे सीएनजी किट बसवायचे आहे. मात्र, त्यांना अर्थ साहाय्य मिळत नसल्यामुळे ते शक्‍य होत नाही.

फायदेशीर किट
दुचाकीसाठी तयार करण्यात आलेले कीट पर्यावरणपूरक असे आहे. यामुळे हायड्रोकार्बनचे प्रमाण ७५ टक्‍क्‍यांनी तर कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण २० टक्‍क्‍यांनी कमी होणार आहे. एक किलो गॅसमध्ये दुचाकी ६५ ते ७० किलोमीटर धावणार आहे. या कीटमध्ये दोन सिलिंडर बसवण्यात आले असून त्यामध्ये दोन किलो सीएनजी बसतो. 

पेट्रोलपेक्षा सीएनजी स्वस्त
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे दर रोज वाढत आहेत. सध्या पेट्रोलचा प्रतिलिटरचा दर ९० रुपयापर्यंत जाऊन पोचला आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये दुचाकी ३५ ते ४० किलोमीटर धावते. सीएनजीचा एका किलोचा दर ५२ रुपये आहे. यामध्ये दुचाकी ७० किलोमीटरपर्यंत चालते. पेट्रोलच्या तुलनेत हे खूपच स्वस्त आहे.

शहरात सीएनजीवर धावणारी दुचाकी वाहने - १५०
शहरातील सीएनजी पंपांची संख्या - २२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT