Two-wheeler dies after hitting tempo in pimpri 
पुणे

पिंपरीत टेम्पोला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : रहदारीच्या रस्त्यावर धोकादायकरित्या उभ्या केलेल्या टेम्पोला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मोशी येथे घडली. सचिन दत्ता बाशिंगे असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी संजय बाहुलाल गडकररा (रा. संजय गांधीनगर, मोशी) या टेम्पोचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

सोमवारी (ता. 16) दुपारी दीडच्या सुमारास आरोपीने त्याचा टेम्पो (एमएच 14 सीपी-4562) पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी येथील गोल्डन पाल्म सोसायटीसमोर धोकादायकरित्या उभा केला होता. यावेळी इंडिकेटरही लावलेले नव्हते. दरम्यान, सचिन बाशिंगे हे मोशीहून भोसरीच्या दिशेने (एमएच 14, एचएन 4405) या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना रस्त्यात धोकादायकरित्या उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून त्यांची दुचाकी धडकली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

बाशिंगे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT