मोटरसायकल अपघातात एकाचा मृत्यू Sakal
पुणे

आंबवणे येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

नसरापूर वेल्हे रोड वरील आंबवणे गावाजवळ अपघात

मनोज कुंभार

वेल्हे, (पुणे) - नसरापूर वेल्हे रोड वरील आंबवणे गावाजवळ झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाली आहेत आज मंगळवार (ता.३१)सायंकाळी पाच वाजणे सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोकुळ गुलाब बांदल (वय२९) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. तर काळू अन्यबा बांदल (वय ५५) व नारायण मारुती इंगवले (वय ६०) यांच्यावर नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. तीघेही निगडे बुद्रुक (ता.वेल्हे) येथील रहिवासी असुन चारचाकी व दुचाकीचा नंबर मिळाला नसुन चारचाकी नसरापूर कडून वाजेघर कडे निघाली होती तर दुचाकी ही करंजावणेकडुन कडून अंबवणेकडे जात असताना समोरासमोर धडक झाली होऊन अपघात झाला आहे.

या ठिकाणी आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी बांध पेटवल्या ने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूर आल्याने हा अपघात झाला असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी वर्तवली असून गोकुळ बांदल यास उपचारासाठी नसरापूर येथील खासगी दवाखान्यात नेले असता परिस्थिती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी पुणे येथील भारती विद्यापीठ दवाखान्या मध्ये नेले असता येथील डॉक्टरांनी संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले मृत व्यक्तीचा शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला असून इतर दोन अपघातग्रस्ततांवर नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू असुन वेल्हे पोलीसांकडुन अधिक तपास सुरु असुन रात्री उशिरापर्यत पुढील कार्यवाही सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

Telegram Ban India : NEET परीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी, 'या' तारखेपासून पुन्हा होणार सुरू

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय! विहिरीत उडी मारून केला निषेध

Neeraj Chopra: दुखापतीनंतर नीरज चोप्रा थेट 'या' मोठ्या स्पर्धेतून मैदानात उतरणार! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निवडीबाबत मोठी अपडेट

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

SCROLL FOR NEXT