दोन महिलांच्या पर्सची
विवेक एक्स्प्रेसमधून चोरी
कुर्डुवाडी, ता. २४ : एकाच डब्यातून बंगळूरू ते पुणे प्रवास करणाऱ्या दोन महिलांच्या झोपेचा फायदा घेत चोरट्यांनी दोन पर्स चोरल्या. या घटना विवेक एक्स्प्रेसच्या एस ४ या बोगीमध्ये मंगळवारी (ता. २३) मध्यरात्रीच्या सुमारास वाकाव ते माढा रेल्वे स्थानकादरम्यान घडल्या. यामध्ये सुमारे ७२ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला.
रतनचंद जैन (रा. म्हैसूर) यांनी कुर्डुवाडी रेल्वे पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे आपल्या पत्नीसह बंगळूरू येथून नातेवाइकांच्या लग्नासाठी पुण्याला विवेक एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. मध्यरात्री प्रवासा दरम्यान ते झोपले असता फिर्यादीच्या पत्नीच्या खांद्याला अडकवलेली पर्स चोरट्याने लांबवली. यामध्ये रोख रकमेसह मोबाईल असा ४२ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला.
त्याच बोगीच्या बर्थ क्रमांक ३० वरून हरकचंद लोनीया (रा. बंगळूरू) हे आपल्या पत्नीसह प्रवास करत होते. त्यांच्याही झोपेचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या पत्नीची हँडबॅग लंपास केली. यामध्ये रोख रकमेसह मोबाईल असा ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.