Pune Metro sakal
पुणे

Pune Metro : महिलांच्या हाती स्टिअरिंग! ;प्रतीक्षा माटे आणि पूजा काळे यांना मिळाला बहुमान

मेट्रोमार्गाच्या उद््घाटनानंतर धावलेल्या पहिल्याच मेट्रोचे स्टिअरिंग दोन महिलांच्या हाती होते. प्रतीक्षा माटे आणि पूजा काळे यांना हा बहुमान मिळाला. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीदरम्यान पूजा, तर रामवाडी ते रुबी हॉल क्लिनिकदरम्यान प्रतीक्षा यांनी मेट्रो चालविली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मेट्रोमार्गाच्या उद््घाटनानंतर धावलेल्या पहिल्याच मेट्रोचे स्टिअरिंग दोन महिलांच्या हाती होते. प्रतीक्षा माटे आणि पूजा काळे यांना हा बहुमान मिळाला. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीदरम्यान पूजा, तर रामवाडी ते रुबी हॉल क्लिनिकदरम्यान प्रतीक्षा यांनी मेट्रो चालविली.

प्रतीक्षा यांनी सांगितले की, ‘मी यापूर्वी वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गावर मेट्रो चालवली आहे. त्यानंतर आज माझ्याकडे रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गाची जबाबदारी देण्यात आली होती. आजचा प्रवास माझ्यासाठी मोठा आनंद देणारा होता. यानिमित्ताने एक वेगळा अनुभव मिळाला.’ प्रतीक्षा मूळच्या नागपूरच्या आहेत. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. प्रशिक्षणानंतर त्या मेट्रोत रुजू झाल्या.

पूजा यांनी सांगितले की, ‘आजचा प्रवास वेगळा अनुभव देणारा होता. उद््घाटनाच्या दिवसाबद्दल मोठी उत्कंठा होती. प्रवाशांनी आमचे खूप कौतुक केले, याचा आनंद आगळाच आहे. या मार्गावर गर्दी असते. त्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही समावेश असतो. ते सर्वजण आवर्जून संवाद साधतात.’’ पूजा यासुद्धा मूळच्या नागपूरच्या आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT