Accident_Road
Accident_Road 
पुणे

कामावर निघाले होते, टेम्पोची धडक बसली अन् दोघांनी जागीच गमावला जीव!

सकाळ वृत्तसेवा

शिरूर : तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसीतील 'मुरली कृष्णा फार्मा' कंपनीसमोरील चौकात भरधाव वेगातील टेम्पोने ठोकरल्याने मोटारसायकलवरील दोघा कामगारांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. 

किरण माणिक गिरमकर (वय २७, रा. उरळगाव, ता. शिरूर, जि. पुणे) आणि रविंद्र अशोक भंडलकर (वय ३४, रा. टाकळी भीमा, ता. शिरूर, जि. पुणे) अशी या अपघातात मृत्युमूखी पडलेल्या कामगारांची नावे असून, ते दोघेही रांजणगाव एमआयडीसीतील सी व्हेरॉक आणि इतर दोन कंपन्यांत सुपरवायझर म्हणून काम पाहात होते.

व्हेरॉक कंपनीतील काम संपवून ते दोघे गिरमकर यांच्या मोटारसायकल (क्र. एमएच 12 एलक्यू 1547) वरून दुस-या एका कंपनीत चालले होते. एमआयडीसीतीलच मुरली कृष्णा कंपनीसमोरील चौकातून ते जात असताना दुसऱ्या बाजूने भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पो (क्र. एमएच १२ आरएन ९६०९) ची त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक बसली. या धडकेमुळे दोघेही चौकातील दुभाजकावर जाऊन आदळले. यात दोघांच्या डोक्याला मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर, टेम्पोचालक टेम्पो घेऊन पळून गेला होता. परंतु स्थानिकांनी याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी रांजणगाव गणपतीजवळ हा टेम्पो पकडला. हयगयीने टेम्पो चालवून अपघात केल्याप्रकरणी टेम्पोचालक प्रसाद सुनिल कातोरे (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, मूळ रा. राहुरी, जि. नगर) याला पोलिसांनी अटक केली. पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. यु. येळे करीत आहेत.

या अपघाताच्या निमित्ताने रांजणगाव एमआयडीसीतील वाढत्या वाहनांचा, बेशिस्त वाहतुकीचा आणि एकूणच खबरदारीच्या अभावाचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला. शुक्रवारी ज्या चौकात अपघात झाला, त्या मुरली कृष्णा कंपनीजवळील चौकातील रस्ता मूळातच अरुंद असून, चौकाच्या चारही बाजूंना कंपन्या आणि थेट रस्त्यालगत कंपन्यांचे कंपाऊंड असल्याने इतर बाजूने चौकात येणाऱ्या वाहनांचा अंदाज इतर वाहनचालकांना लवकर येत नाही. त्यातच काही कंपन्यांसमोर मोठ्या वाहनांची वर्दळ असते.

कंपनीत मालाची चढ-उतार करण्यासाठी आलेले टेम्पो, कंटेनर आणि इतर वाहनेही कंपनीजवळ रस्त्याकडेलाच उभी केलेली असल्याने मोटारसायकलस्वार कामगारांना नेहमी जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. रांजणगाव एमआयडीसी अंतर्गत अशी अनेक धोकादायक ठिकाणे असून, या भागात बेकायदा आणि बेशिस्तीने उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी स्थानिक कामगारांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

SCROLL FOR NEXT