Pune News sakal
पुणे

Pune News : मांडओहोळ धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

पाण्याची खोली लक्षात न आल्याने कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील मांडओहोळ धरणात बुडून दोन तरुणांचा पाण्यात मृत्यू झाला आहे. अथर्व श्रीनिवास श्रीराम (वय १७), सौरभ नरेश मच्चा (वय १७, दोघेही रा. शिवाजीनगर, अहमदनगर) यांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर : पाण्याची खोली लक्षात न आल्याने कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील मांडओहोळ धरणात बुडून दोन तरुणांचा पाण्यात मृत्यू झाला आहे. अथर्व श्रीनिवास श्रीराम (वय १७), सौरभ नरेश मच्चा (वय १७, दोघेही रा. शिवाजीनगर, अहमदनगर) यांचा मृत्यू झाला आहे.

अर्थव, सौरभ यांच्यासह एकूण सहा विद्यालयातील मित्र पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा मंदिर, कुंड परिसर येथे पर्यटनासाठी आले होते. देवीचे दर्शन व परिसर पाहिल्यानंतर मांडओहोळ धरणाकडे जाण्याचा निर्णय झाला. तेथेच पोहण्याची इच्छा सर्वांनी व्यक्त केली. त्यानुसार सर्वजण मांडओहोळकडे रवाना झाले.

मांडओहोळ धरणात देखील पाण्याचा मृतसाठा शिल्लक आहे. पोहण्यासारखी परिस्थितीत नाही. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे. तेथील खोली शेतकऱ्यांनी गाळ काढला असल्याने मोठ्या प्रमाणात खाली गेली आहे. हाच अंदाज या तरुण मुलांना आला नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्थव यास पाण्यातून वर काढण्यात आले. मात्र सौरभ याला सायंकाळी उशिरापर्यंत पाण्यातून काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

विद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या असल्याने सध्या पर्यटनस्थळावर सगळीकडेच गर्दी पहावयास मिळत आहे. ही मुले देखील पर्यटनासाठीच इकडे आली होती. मात्र जेमतेम पोहता येत असताना ते पाण्यात उतरले. तरुणांनी नवीन पोहण्याचा प्रयत्न करू नये.

- समीर बारवकर,

पोलिस निरीक्षक, पारनेर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT