पुणे

.

CD

‘डॉल्फिन’चा जपानला तडाखा

जोरदार पाऊस, वीजपुरवठा खंडित; चक्रीवादळ चीनला धडकणार

टोकियो/बीजिंग, ता. ८ (पीटीआय) : ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाने शनिवारी जपानच्या ओकिनावा प्रांताला जोरदार तडाखा दिला. या चक्रीवादळात सहा जण जखमी झाले असून, ५० हजारांहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, हे चक्रीवादळ चीनच्या पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याने तेथील बंदरे बंद करण्यात आली असून, जहाज सेवाही थांबवण्यात आली आहे.
ओकिनावामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पडल्याने तीन वृद्धांसह पाच जण जखमी झाले आहेत, तर कागोशिमा प्रांतात एक जण जखमी झाला आहे. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे प्रशासनाने सांगितले. या चक्रीवादळाचा ताशी वेग १६२ किलोमीटर असून, वाऱ्याचा कमाल वेग २१६ किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. जपानमधील ओकिनावा आणि कागोशिमा प्रांतातील अमामी बेटाला या वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये हे चक्रीवादळ रविवारी रात्री उशिरा किंवा सोमवारी पहाटे धडकण्याची शक्यता आहे. चिनी प्रशासनाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. चीनच्या राष्ट्रीय हवामान केंद्रानुसार, हे चक्रीवादळ झेजियांग प्रांतातील झौशान शहर आणि फुजियान प्रांतातील फुडिंग शहर यांच्या दरम्यान धडकण्याची दाट शक्यता आहे.

बंदरे आणि विमानतळ बंद

पूर्व चीनमध्ये १२ ऑगस्टपर्यंत शांघायसह लगतच्या प्रांतांमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. झेजियांगच्या काही भागात ६०० मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. झेजियांगमध्ये किनारपट्टीवर सर्वोच्च इशारा जारी करण्यात आला असून, बंदरातील कामकाज थांबवण्यात आले आहे.

उड्डाणे रद्द
झेजियांगमधील निंगबो लिशे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील रविवारची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शांघायमधील यांगशान बंदर शुक्रवारी रात्रीच रिकामे करण्यात आले असून, यांगत्से नदीच्या खोऱ्यातील रेल्वे सेवा रविवारपासून बंद राहणार आहे. बीजिंग प्रशासन वादळाच्या मार्गावर लक्ष ठेवून असून स्थलांतराची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

तैवानमध्येही यंत्रणा सतर्क

तैवानमध्ये वादळाच्या संभाव्य तडाख्यामुळे ७८ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बेटाच्या उत्तर भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी अद्याप स्थलांतराचे आदेश देण्यात आलेले नाहीत. दरम्यान, तैवानच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांनी चीनच्या वाहतूक नियंत्रण सूचनांचे पालन करावे, असे आदेश चीनने दिले आहेत. तैवानने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT