फोटो ः आर्यन हिंगणे
आर्यन चौहान
------------
ॲम्बिशियस आणी पूना क्लब यांच्यात अंतिम लढत
एकोणीस वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा
पुणे, ता. ९ ः पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित एकोणीस वर्षांखालील गटाच्या पहिल्या दोशी इंजिनिअर्स करंडक निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पूना क्लब व ॲम्बिशियस क्रिकेट क्लबने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून अंतिम फेरी गाठली आहे.
सहकारनगर येथील ल. रा. शिंदे प्रशालेच्या मैदानावरील पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत आर्यन हिंगणेच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर पूना क्लबने आर्यन्स संघाचा १३० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पूना क्लबने २७१ धावा केल्या. यावेळी क्षितिज येडेने ८६ चेंडूत तेरा चौकार व एक षटकारासह ७८ धावांची खेली केली त्याला मधुर कचरेने सात चौकारासह ४९ धावांची खेळी करत सुरेख साथ दिली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १०३ चेंडूत ९३ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर श्रेयस शिवरकरने ६१ चेंडूत पाच चौकार व पाच षटकारासह ६८ धावांचा खेळी केली. शिवेन भारद्वाजने चार, निहाल काझीने तीन तर श्रवण माळीने दोन गडी बाद केले. प्रत्यूत्तर देताना आर्यन्स संघाचा डाव १४१ धावांत आटोपला. यावेळी आर्यन घोडकेने नऊ चौकार व एक षटकारासह ६२ धावांची खेळी केली. आर्यन हिंगणेने चार तर साहिद मन्सुरीने दोन गडी बाद केले.
आर्यन्स क्रिकेट मैदानावरील उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आर्यन चौहानच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ॲम्बिशियस क्लबने डक वर्थ लुईस नियमानुसार स्टार्स क्लबवर सात धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना स्टार्स क्लबने ८ बाद २२८ धावा केल्या यावेळी रोहन शिरभातेने तीन चौकार व दोन षटकारासह ५७ धावांची खेळी केली. आर्यन चौहान व अनुरागसिंगने प्रत्येकी तीन गडी बाद केले. प्रत्यूत्तर देताना
ॲम्बिशिअस क्लबने ४५.४ षटकांत ८ बाद २१८ धावा केल्या होत्या यावेळी त्यांच्या खेळाडूंनी अपुऱ्या प्रकाशाचे केलेले अपिल पंचानी मान्य केले आणी ॲम्बिशियस क्लबने डक वर्थ लुईस नियमानुसार विजय मिळविला. यावेळी ॲम्बिशिअस क्लबकडून स्वराज्य थरकुडेने नाबाद ४२ धावांची आणी श्रेयश गायकवाडने केलेली ४२ धावांची खेळी उपयुक्त ठरली. अवनीश बुधवानी, रोहन शिरभाते व एरॉन बिनुने प्रत्येकी दोन गडी बाद केले. या स्पर्धेतील पूना क्लब व ॲम्बिशियस क्रिकेट क्लब यांच्यातील अंतिम सामना बारा तारखेला पीवायसी क्लबच्या मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेतील ‘सामनावीर’ हा मान आर्यन हिंगणे (पूना क्लब) आणी आर्यन चौहानने (ॲम्बिशिअस क्लब) पटकाविला.
--------------
एकोणीस वर्षांखालील क्रिकेट जोड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.