पुणे

होर्मुझ सामुद्रधुनीत दोन जहाजांवर हल्ला

CD

दुबई, ता. १४ (पीटीआय) : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दोन तेलवाहू जहाजांवर शुक्रवारी ड्रोनद्वारे हल्ला झाला. हा हल्ला इराणनेच घडवून आणल्याचा दावा ‘यूएई’ने केला आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, पर्शियाच्या आखातातून जाणाऱ्या या महत्त्वाच्या जलमार्गावरील धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत. अबुधाबीच्या ‘ॲडनॉक’ या सरकारी तेल कंपनीच्या दोन जहाजांवर हा हल्ला झाला. या हल्ल्यात जहाजांचे किरकोळ नुकसान झाले. व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर आर्थिक दबावासाठी करणे, हे इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’चे कृत्य असल्याचा आरोप ‘यूएई’ने केला आहे. हे कृत्य संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे उल्लंघन असून प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी थेट धोका आहे, असेही ‘यूएई’ने म्हटले आहे. या आरोपांवर इराणकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

SCROLL FOR NEXT