पुणे

जहाजावर ताबा घेत इराणला रवाना

CD

दुबई, ता. १४ (पीटीआय) : संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) पूर्व किनारपट्टीवर नांगरून उभे असलेले एक जहाज काही अज्ञात व्यक्तींनी ताब्यात घेत ते इराणकडे नेले जात असल्याची माहिती ब्रिटनच्या ‘युनायटेड किंग्डम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स’ने दिली. फुजेराह बंदरापासून ७० किलोमीटरवर असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळून काही अज्ञात व्यक्तींनी या जहाजाचा ताबा घेतला. या घटनेचा तपास सुरू असून अद्याप कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे नेते शी जिनपिंग यांच्यात बीजिंगमध्ये महत्त्वाची बैठक सुरू असतानाच ही घटना घडली. या दोन्ही नेत्यांच्या चर्चेत इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाचा मुद्दा केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे. इराणने गेल्या काही दिवसांत अनेक जहाजे ताब्यात घेतली असून, गेल्या आठवड्यात ‘ओशन कोई’ या तेलवाहू जहाजावरही कारवाई केली होती. फुजेराह हे तेलनिर्यातीसाठी महत्त्वाचे केंद्र असून युद्धाच्या काळात या भागावर वारंवार हल्ले झाले आहेत.

तणाव वाढला
‘यूएई’च्या किनारपट्टीजवळून एक जहाज ताब्यात घेऊन इराणच्या दिशेने नेल्याच्या घटनेनंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव वाढला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले असून, अमेरिका आणि ब्रिटनने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घडामोडीमुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली असून, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत कोणत्याही प्रकारची घुसखोरी किंवा बेकायदा कारवाई सहन केली जाणार नाही, असा इशारा अमेरिकेने दिला आहे, तर ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे आणि सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन होत असल्याची भावना अनेक युरोपीय आणि आशियाई देशांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT