Fasting Sakal
पुणे

Fasting : उंड्री गाव कृती संघर्ष समितीचा आठव्या दिवशीही उपोषणास्र सुरूच

महापालिका प्रशासनाविरोधात आज सलग आठव्या दिवशीही आंदोलन सुरू असून, दररोज परिसरातील नागरिकांकडून पाठिंबा व्यक्त केला जात आहे.

अशोक बालगुडे

महापालिका प्रशासनाविरोधात आज सलग आठव्या दिवशीही आंदोलन सुरू असून, दररोज परिसरातील नागरिकांकडून पाठिंबा व्यक्त केला जात आहे.

उंड्री - जागरण झाले..., गोंधळ झाला..., भजन झाले... पोतराजाने अंगावर कोरडेही ओढले... गाववाल्यांसह आमदार, माजी मंत्र्यांनीही भेट देऊन पाठिंबा दर्शविला, तरीसुद्धा झोपेचं सोंग घेतलेले महापालिका प्रशासन आता नेमके काय केल्यानंतर? आमच्या आंदोलनाची दखल घेऊन या जाचक करातून मुक्तता करेल? अशी विचारणा उंड्री गाव कृती संघर्ष समितीने केली आहे.

महापालिका प्रशासनाविरोधात आज सलग आठव्या दिवशीही आंदोलन सुरू असून, दररोज परिसरातील नागरिकांकडून पाठिंबा व्यक्त केला जात आहे. मात्र, पालिका प्रशासन अद्याप उंड्रीसह समाविष्ट गावांतील नागरिकांच्या जाचक करवाढीविषयी निद्रित का आहे, असा सवाल सामान्यजणांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उंड्रीतील उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी उपोषणकर्त्यांविषयी विचारणा केली. शांततेत चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. सर्व गावांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल. उद्या (बुधवार, दि. २८ डिसेंबर, २०२२) पालिकेतील अधिकारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करतील. तसेच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उपोषणकर्त्यांना त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT