पुणे

उडतरेत वनराई बंधाऱ्यांची उभारणी

CD

उडतरेत वनराई बंधाऱ्यांची उभारणी

ग्रामपंचायत, बाळासाहेब पवार हायस्कूलचा संयुक्त उपक्रम

उडतरे, ता. २६ : ग्रामपंचायत उडतरे आणि बाळासाहेब पवार हायस्कूल, उडतरे यांच्या संयुक्त विद्यमाने तारळेच्या ओढ्यावर दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. या उपक्रमात शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जलसंधारणासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या वेळी सरपंच अर्चना पवार, ग्रामविकास अधिकारी किरण निकम, विनोद बाबर, संतोष कुंभार, पंचायत समितीच्या सदस्या राणी पवार, मुख्याध्यापक दादासाहेब बनसोडे आणि हरित सेना प्रमुख प्रकाश सोनवणे उपस्थित होते.
बाळासाहेब पवार हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. यामध्ये कंपोस्ट खतनिर्मिती, गांडूळखत प्रकल्प, प्लॅस्टिकमुक्त अभियान, बीज संकलन आणि वृक्षारोपण अशा उपक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावे, हा या उपक्रमांमागील उद्देश आहे.
विद्यालयाच्या वतीने वाढदिवसानिमित्त शाळेला देणगी देणे, पाच झाडे लावणे, बांधावर वृक्षलागवड करणे, तसेच ‘विमा के नाम’ यांसारखे विविध उपक्रम राबविले जातात.
या सर्व उपक्रमांना सामाजिक वनीकरण विभाग, वाई, सामाजिक वनीकरण विभागीय कार्यालय, सातारा, तसेच वनविभाग, सातारा यांचे सहकार्य लाभत आहे. ग्रामपंचायत, शाळा आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित सहभागातून पर्यावरण संवर्धन व जलसंधारणाच्या कार्याला चालना मिळत आहे.

------------------------

61261
उडतरे ः येथील ओढ्यावर वनराई बंधारा बांधताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी व बाळासाहेब पवार हायस्कूलचे शिक्षक वृंद.

---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे अपडेट्स! केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी काय महत्त्वाचं?

Vishwajeet Kadam Warning to Government : सांगलीला पाणी द्या! "कोणी आडवं आलं तर गाठ माझ्याशी!"; विश्वजीत कदमांचा मंत्री शंभूराज देसाईंना थेट इशारा!

टोरंट प्रकल्पाविरोधात शिवसेनेचा एल्गार! कर्जतच्या जंगलातील वृक्षतोडीवरून आक्रमक भूमिका; सत्ताधाऱ्यांना घेरले

SHUKRA UDAY 2026 ASTRO PREDICTIONS: नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार? शुक्राच्या उदयाने धनलाभासह करिअरमध्येही येणार प्रगतीचे योग!

Maharashtra Live News: बंद कार्डधारकाचा माल पूर्ववत करण्यासाठी काँग्रेसचे धरणे

SCROLL FOR NEXT