uday samant  esakal
पुणे

'सोज्वळ चेहऱ्यामागचे प्रकार...'; हल्ल्यानंतर सामंतांचा ठाकरेंवर प्रहार

हल्ल्याच्या काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंची सभा झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात काल शिंदे गटातले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. या हल्ल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निषेध केला आहे. या हल्ल्याबद्दल उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना सामंतांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतला एक संदर्भही दिला आहे. सामंत म्हणतात, मला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतला एक शब्दप्रयोग आवडला. तो म्हणजे राजकारण आरोग्यदायी असलं पाहिजे. पण दुसऱ्यावर हल्ला करणं, त्यांचं आरोग्य हिरावून घेणं हे कसलं राजकारण? हल्ला करणं म्हणजे उत्स्फुर्त प्रतिक्रिया असं म्हणणाऱ्यांची कीव येते, असं म्हणत सामंतांनी सुभाष देसाईंनाही टोला लगावला आहे.

सामंत पुढे म्हणाले की, माझ्या कार्यकर्त्यांनी असा हल्ला केला असता तर मीच त्यांना ताब्यात दिलं असतं. हल्ला करणारे शिव्या देत होते, आमच्या आयाबहिणींचा उद्धार करत होते. या हल्लेखोरांच्या हातात दगड बांधलेले होते, त्यांनी काच फोडली, बोनेटवर उभे राहिले. राजकारण किती खालच्या थराला जातंय हे त्याचंच प्रतिक आहे. राज्याच्या जनतेसमोर संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. सोज्वळ चेहऱ्यामागचे हे प्रकार काल जनतेने पाहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT