पुणे

उदयनराजेंची मोहीम फत्ते!

CD

सातारा, ता. ४ : सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज झालेल्या मतमोजणीत महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा तब्बल ३२ हजार ७७१ मतांनी पराभव केला. सुरुवातीला शशिकांत शिंदेंनी १९ हजारांचे मताधिक्य घेऊन आघाडी घेतली आणि विजयी जल्लोषही केला; पण १४ व्या फेरीनंतर बाजी पलटली आणि उदयनराजेंचे मताधिक्य वाढत जाऊन त्यांनी विजयश्री खेचून आणली. शशिकांत शिंदेंना पराभवाचा धक्का दिला. शिंदेंना वाई, कऱ्हाड उत्तर आणि पाटण मतदारसंघांनी अल्पसे मताधिक्य दिले, तर सातारा, कऱ्हाड दक्षिण व कोरेगाव मतदारसंघांनी उदयनराजेंचा विजय सुकर केला.
अटीतटीने आणि चुरशीने झालेल्या या निवडणुकीत तुतारीच बाजी मारेल, अशी चर्चा रंगली होती; पण अगदी एक्झिट पोलचे अंदाजही या निकालाने फोल ठरवले. उदयनराजेंची उमेदवारी जाहीर करण्यात भाजपने उशिरा केला होता, तर श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणांनी माघार घेतल्यामुळे उमेदवार कोण याचीच चर्चा या मतदारसंघात होती. अर्ज भरण्याच्या तोंडावर उदयनराजे व शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली. सुरुवातीच्या टप्प्यात महाविकास आघाडी प्रचारात आघाडीवर होती. त्यामुळे शशिकांत शिंदे यांना चांगले वातावरण होते; परंतु अखेरच्या टप्प्यात भाजप व उदयनराजे यांनी अनेक डावपेच टाकले. कऱ्हाडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची, तर वाईत अजित पवारांची सभा झाल्यानंतर वातावरण फिरायला सुरुवात झाली. त्याचेच प्रतिबिंब आजच्या निकालात दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Gokul Election : सतेज पाटलांनी ताकद दाखवली, एकट्याने १८५१ ठराव केले दाखल; 'लवकरच बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार'

ICC चं वेळापत्रक ठरलं वादाचं कारण! एका प्रश्नानंतर माजी क्रिकेटपटूंना जीवे मारण्याच्या धमक्या; महिला टी-20 विश्वचषकात मोठा वाद

Latest Marathi News Live Update : राज्यात 5 दिवस अतिमुसळधार पाऊस; कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट

Viral Rescue video: भर पावसात रात्र काढली जंगलात; अतिउत्साह नडला; गोव्यातील सहा युवकांची अखेर सुटका, व्हिडिओ व्हायरल..

लग्नाला १४ वर्ष झाली, पण पाळणा हलला नाही; पत्नीला राग अनावर, संतापात पतीच्या गुप्तांगावर उकळतं पाणी ओतलं अन्...

SCROLL FOR NEXT