

Heavy Rain, Dense Forest, Viral Rescue: Six Goa Trekkers Brought to Safety
esakal
दोडामार्ग: विर्डी येथील वज्र सखल धबधब्यावर वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या गोव्यातील सहा युवकांना आततायीपणा महागात पडला. जोरदार पावसाच्या आगमनाने ओढ्यांना भरमसाट आलेल्या पाण्यामुळे त्यांचा परतीचा प्रवास थांबला आणि रविवारी (ता. २८) रात्रभर जंगलातील भयाण परिस्थितीचा सामना करत निर्जनस्थळी अडकून राहण्याची नामुष्की ओढवली. गोव्यातील बचाव पथकाने थरारक, अशी शोधमोहीम राबवून आज पहाटे त्यांना सुखरूप माघारी आणले.