Ram Mandir  SAkal
पुणे

Ram Mandir : राम मंदिराच्या विरोधात पुरावे देणाऱ्यांमध्ये ‘ते’ही सहभागी; डॉ. दिनेश शर्मा यांची टीका

‘‘उद्धव ठाकरे अजूनपर्यंत रामलल्लाच्या दर्शनासाठी गेलेले नाहीत. इतर ठिकाणी फुलं वाहायला जरूर गेले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या विरोधात ज्यांनी पुरावे दिले, त्यांच्यात उद्धव ठाकरे सहभागी झाले आहेत

सकाळ वृत्तसेवा

Pune News : ‘‘उद्धव ठाकरे अजूनपर्यंत रामलल्लाच्या दर्शनासाठी गेलेले नाहीत. इतर ठिकाणी फुलं वाहायला जरूर गेले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या विरोधात ज्यांनी पुरावे दिले, त्यांच्यात उद्धव ठाकरे सहभागी झाले आहेत,’’ अशी टीका भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी आणि उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी केली.

एवढंच नव्हे तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्याबाबत बोलताना डॉ. शर्मा यांनी ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या नितीवर कोण चालले आहे पहा’, अशी टिप्पणी केली.

लोकसभेतील उमेदवारांच्या प्रचारादरम्यान पुणे दौऱ्यावर आलेल्या शर्मा यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘इंडिया आघाडीमध्ये चांगले नेतृत्व, नीती आणि नियत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस हे परिवारवादी आहेत. महाविकास आघाडी विस्कळित आहे.

उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस एकमेकांना संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. चार जूनला निकाल लागतील, त्यावेळी सगळ्यांना मिळून विरोधी पक्ष नेता देखील ठरवता येणार नाहीत, इतक्या कमी जागा त्यांना मिळतील.’’

बारामतीत आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विजय महायुतीचा होईल, असा विश्वासही डॉ. शर्मा यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘महायुतीत कोण कोणत्या जागेवर लढत आहे, याला फारसे महत्त्व नाही. सगळ्या जागेवर विजय मिळविणे, हे उद्दिष्ट आहे. विदर्भाच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे निकाल भाजपच्या बाजूने एकतर्फी लागणार आहे. लाखोंच्या फरकाने भाजपचे उमेदवार निवडून येणार आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ''ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है..'', एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; पक्षात येणाऱ्यांबद्दल थेटच बोलले

Uddhav Thackeray: शिवसेना काँग्रेससोबत विलीन होणार का? उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर देत विषयच संपवला!

''मी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार, पण... ''; उद्धव ठाकरेंनी घातली मोठी अट, काय म्हणाले?

Virar News : देश-विदेशात वसईच्या सुकेळींचे नाव पोहोचविणारे पायस रॉड्रिक्स पडद्या आड

Pune News : भाजप नगरसेवकांच्या वर्तनावर महापौरांची नाराजी; दालनात बोलावून दिली समज

SCROLL FOR NEXT