पुणे

ओमराजे यांच्या ''बंडखोरी''नंतर उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर

CD

उद्धव ठाकरे रविवारी
धाराशिवच्या दौऱ्यावर
--
ओमराजेंच्या बंडखोरीनंतर कार्यकर्त्यांशी संवाद
---
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २३ : शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी (ता. २८) दुपारी चारला धाराशिव दौऱ्यावर येत आहेत. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या बंडखोरीनंतर ते काय भूमिका मांडणार, याकडे राजकीय गोटाचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या (उबाठा) सहा खासदारांनी सोमवारी (ता. २२) शिवसेनेत प्रवेश केला. त्यात धाराशिवचे खासदार राजेनिंबाळकर यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे येथे येत आहेत. ते राजेनिंबाळकरांवर काय बोलणार, याकडे लक्ष असेल. ठाकरेंच्या दौऱ्याची आणि शहरातील कार्यक्रमांची जबाबदारी आमदार अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील आणि संपर्क प्रमुख सुनील काटमोरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. धाराशिव शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयात रविवारी (ता. २८) दुपारी चारला संवाद दौऱ्यात ठाकरे हे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीत पक्षाची विस्कळित झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी, जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाब्बास ! दुसरा नीरज चोप्रा; आशिष यादवने U20 World Championships मध्ये जिंकलं ऐतिहासिक पदक; शेतकऱ्याच्या लेकाची भरारी

मुंबईत भररस्त्यात बर्थडेचा धिंगाणा! बोनेटवर केक कटिंग अन् एअरगनने गोळीबार, भाजप कार्यकर्त्यासह १० जणांना अटक; Video Viral

Shoumika Mahadik Satej Patil : भावा हे कोल्हापूर! वर्षानुवर्षांचा राजकीय वाद बाजूला; शौमिका महाडिकांनी कुटुंबीयांसोबत सतेज पाटलांचे केले सांत्वन

Bofors Case: ‘बोफोर्स’ प्रकरणाला ४० वर्षांनी पूर्णविराम, सर्वोच्च न्यायालयातील शेवटची याचिकाही निकाली

Delhi High Court: आंदोलनाची जागा का बदलत नाही?; दिल्ली उच्च न्यायालयाची जंतरमंतरविषयी विचारणा

SCROLL FOR NEXT