पुणे

उद्धव ठाकरेंचे नाकर्तेपणाचे आंदोलन

CD

ठाकरेंचे आंदोलन हे नाकर्तेपणाचे : फडणवीस
छत्रपती संभाजीनगर, ता. १७ : ‘‘जनतेने उद्धव ठाकरेंनाही संधी दिली होती; परंतु, त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे आज ते करत असलेले ‘तुमसे ना हो पायेगा’ हे आंदोलन नाकर्तेपणाचेच आहे’, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गुरुवारी केला.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी विभागीय आयुक्तालयावर राज्य सरकारविरोधात ‘तुमसे ना हो पायेगा’ हे जनआंदोलन करण्यात आले. त्याबाबत विचारले असता, फडणवीस यांनी ठाकरेंचा समाचार घेतला. डीएमआयसी कोणी केली? डीएमआयसीमध्ये उद्योग कोणी आणले? आज छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे देशातील ईव्हीचे मॅग्नेट तयार झाले. हे कोणामुळे झाले? तुम्ही केवळ विरोध करत राहा, हे नाकर्त्यांचेच आंदोलन आहे’, असेही फडणवीस म्हणाले. यूपीआय व्यवहारांवर आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत राहुल गांधी यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठीचा कणा ताठ ठेवावा’, असे वक्तव्य केले होते. त्यावर विचारले असता फडणवीस म्हणाले, ‘पहिल्यांदा राहुल गांधींना स्वतःच्या पाठीचा कणा आहे का? हे बघावे लागेल; कारण ते सकाळी एक बोलतात आणि संध्याकाळी एक बोलतात. जे लिहून दिले जाते तितकेच ते वाचतात. त्यामुळे त्यांना या विषयाची कोणतीही माहिती नसते.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT