uddhav thackeray 
पुणे

Uddhav Thackeray In Pune: ढेकणाला आव्हान द्यायचं नसतं, चिरडायचं असतं; ठाकरेंचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray In Pune shiv sena Melava: उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

कार्तिक पुजारी

पुणे- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज पुण्यात मेळावा झाला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही, तुमची तेवढी कुवत नाही, अशी बोचरी टीका केली आहे.

मी मुंबईच्या शिवसेनेच्या मेळाव्यात म्हणालो होतो. एक तर तू राहशील किंवा मी राहीन. काहीजणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं आहे. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणले महाराष्ट्रावर दरोडेखोरांचा, पक्षावर दरोडे टाकणारा आहे. ढेकणाला आव्हान देत नाही, ढेकणं अंगठ्याने चिरडायची असतात, असं ठाकरे म्हणाले.

त्यांना वाटलं मी त्यांनाच बोललोय. ते म्हणाले माझ्या नादाला लागू नका. तुमच्या नादाला लागण्याइतके तुम्ही कुवतीचे नाही, असा बोचरावार उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केला. बरबादी करणारे सत्तेत राहूच शकत नाहीत. त्यांना सत्तेत बाहेर काढण्यासाठीच मी म्हणतो तू राहशील किंवा मी राहीन, असं देखील ठाकरे म्हणाले.

काँग्रेसकडे ७० वर्षांचा हिशोब मागता, पण एकाच वर्षात संसद गळत आहे, राम मंदिर गळत आहे. त्याचा हिशोब कोण देणार? हिंदूत्वाच्या वेडापायी मोदींना पाठिंबा दिला होता. तो अहमद शहा अब्दाली होता, हे अमित शहा आहेत. अब्दालीचे हे वशंज आहेत. मला हिंदूत्व शिकवता. नवाब मलिकांचे केक खाणारी औलाद तुमची आम्हाला काय हिंदुत्व शिकवता, असा घणाघात ठाकरे यांनी केला.

आमचा तुम्ही विश्वासघात केला. शंकराचार्य त्यामुळेच तुम्हाला विश्वासघाती म्हणतात. शिवरायांचा धर्म पुढे घेऊन जाणारं आमचं हिंदूत्व आहे. शिवराज आणि बाळासाहेब ठाकरे माझं प्रत्येक पाऊल पाहात आहेत. तुमचा सत्ताजिहाद सुरु आहे, अशी टीका त्यांनी केली. ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवर देखील टीका केली. लाच देऊन मत विकत घेण्याचा हा प्रकार आहे, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये! पीएम किसानचा 24 वा हप्ता कधी जमा होणार?

Breaking: स्टोक्स-मॅक्युलमची सत्ता संपली! इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी स्टीफन फ्लेमिंगची नियुक्ती, कर्णधारपदी... ; ECB चा मोठा निर्णय

School Crime News: पुस्तक का नाही आणलंस? शिक्षिका चिडली, रागाच्या भरात पहिलीतील विद्यार्ध्याच्या कानशिलात लगावली नंतर... घटनेनं संताप

Latest Marathi News Live Update : पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन

स्वतःच्या लग्नाला ग्राऊंड्समन्सना बोलावलं... शेतकऱ्यांसाठी उभा राहिला... यशस्वी जैस्वालला शिस्त शिकवली... असा आहे अजिंक्य रहाणे!

SCROLL FOR NEXT