Uddhav Thackeray 
पुणे

भगवदगीता संस्कृतमध्ये आहे की गुजरातीत हे बघायचे आहे : उद्धव ठाकरे

अश्‍विनी जाधव केदारी

पुणे : 'नोटाबंदीचा निर्णय क्षणार्धात घेऊ शकता; मग राम मंदिराचा निर्णय का होऊ शकत नाही', असा प्रश्‍न उपस्थित करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील सत्तेतील भागीदार असलेल्या भाजपवर टीका केली. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक आज (शनिवार) पुण्यात झाली. 

या बैठकीत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. 'पुढील लोकसभा निवडणूक भाजप-शिवसेना एकत्र लढविणार का', हा प्रश्‍न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांनी भाजपवर टीका करतानाच 'एकत्र येण्याचा निर्णय एकजण नाही, अनेकजण घेतात' असे सांगत 'आम्ही एकत्र असू की नाही, हे माहीत नाही', असे विधान केले. 

भगवदगीतेच्या मुद्यावरूनही ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले. 'मला भगवदगीता चाळायची आहे.. ती नक्की संस्कृतमध्ये आहे की गुजरातीत आहे, हे बघायचे आहे.. परीक्षेचे निकाल वेळेवर न लागणे, पेपरफुटीची प्रकरणे झाकण्यासाठी भगवदगीतेचे प्रकरण पुढे केले आहे', असा आरोप ठाकरे यांनी केला. 

ठाकरे म्हणाले, "राम मंदिर, समान नागरी कायदा, 370 कलम रद्द करणे या सगळ्या गोष्टी आतापर्यंत व्हायला हव्या होत्या. त्या का झाल्या नाहीत? एका क्षणात नोटाबंदी होऊ शकते, तसे राम मंदिर का होऊ शकत नाही.'' 

खड्डे आहेत; पण.. 
पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या खड्ड्यांवरून मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीका होत आहे. यावर सारवासारव करताना 'खड्डे पडत आहेत; पण ही जबाबदारी फक्त महापालिकेची नाही.. सर्वांचीच आहे.. ही राज्य सरकारचीही जबाबदारी आहे', असे ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT