पान १६
-------
गद्दार खासदारांविरोधात
ठाकरे गटाची मोहीम
२७ जूनला यवतमाळातून जनसंवाद अभियानाचा श्रीगणेशा
नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून निवडून आलेले सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या चिन्हावर आणि मतदारांच्या विश्वासावर निवडून येऊन पक्षांतर करणाऱ्या खासदारांविरोधात जनमत जागृत करण्यासाठी पक्षाने ‘जनसंवाद अभियान’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाची सुरुवात २७ जून रोजी यवतमाळ येथून होणार असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
या दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे २६ जून रोजी सायंकाळी सहा वाजता मुंबईहून विमानाने नागपुरात दाखल होतील. तेथून ते यवतमाळकडे रवाना होऊन रात्रीचा मुक्काम करतील. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता होणाऱ्या जाहीर सभेत ते पक्षांतर केलेल्या खासदारांवर जोरदार टीका करण्याची शक्यता आहे. यवतमाळ येथील सभेसाठी स्थानिक पातळीवर जोरदार तयारी सुरू असून, मोठ्या संख्येने नागरिक आणि शिवसैनिकांना एकत्र आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यवतमाळनंतर उर्वरित पाच खासदारांच्या मतदारसंघांतही अशाच प्रकारच्या सभा घेण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
या पार्श्वभूमीवर नागपूर येथील शिवसेना कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. या बैठकीस संपर्कप्रमुख सतीश हरडे, महानगरप्रमुख किशोर कुमेरिया, महिला आघाडी संघटक सुशीला नायक व सुरेखा खोब्रागडे, शहरप्रमुख विक्रम राठोड, हरिभाऊ बानाईत तसेच उपशहरप्रमुख पंकज अहिरराव उपस्थित होते.
या वेळी शिवसेना ही कोणत्याही आमदार-खासदारांच्या जोरावर नव्हे, तर पक्षाशी निष्ठा राखणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर उभी असल्याचा दावा सतीश हरडे यांनी केला. ऊन, वारा आणि पाऊस झेलत पक्षासाठी काम करणाऱ्या एकनिष्ठ शिवसैनिकांमुळेच शिवसेना टिकून असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याची सुरुवात नागपुरातून होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असे महानगरप्रमुख किशोर कुमेरिया यांनी सांगितले. नागपुरातील त्यांचे स्वागत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यवतमाळ येथील सभेकडे आता विदर्भासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
-----
माहितीसाठी
गद्दार खासदारांविरोधात ठाकरे गटाची मोहीम;
२७ जूनला यवतमाळातून जनसंवाद अभियानाचा श्रीगणेशा
ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून निवडून आलेले सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या चिन्हावर आणि मतदारांच्या विश्वासावर निवडून येऊन पक्षांतर करणाऱ्या खासदारांना ‘गद्दार’ ठरवत त्यांच्या मतदारसंघात थेट जाऊन जनमत जागृत करण्यासाठी जनसंवाद अभियान सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेची पहिली तोफ २७ जून रोजी यवतमाळ येथे धडकणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे २६ जून रोजी सायंकाळी ६.०५ वाजता मुंबईहून विमानाने नागपुरात दाखल होतील. तेथून ते थेट यवतमाळकडे रवाना होऊन रात्रीचा मुक्काम करणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता होणाऱ्या जाहीर सभेतून ते पक्षांतर केलेल्या खासदारांवर हल्लाबोल करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे विदर्भातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असल्याचे जाणकार सांगतात. यवतमाळ येथील सभेसाठी स्थानिक पातळीवर जोरदार तयारी सुरू असून मतदारसंघातून मोठ्या संख्येने नागरिक आणि शिवसैनिकांना एकत्र आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यवतमाळनंतर उर्वरित पाच खासदारांच्या मतदारसंघातही अशाच प्रकारच्या सभा घेण्यात येणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील शिवसेना कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. बैठकीला संपर्क प्रमुख सतीश हरडे, महानगर प्रमुख किशोर कुमेरिया, महिला आघाडी संघटक सुशीला नायक व सुरेखा खोब्रागडे, शहर प्रमुख विक्रम राठोड, हरिभाऊ बानाईत तसेच उपशहर प्रमुख पंकज अहिरराव उपस्थित होते. दरम्यान, शिवसेना ही कोणत्याही आमदार-खासदारांच्या जोरावर नव्हे, तर पक्षाशी निष्ठा राखणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर उभी असल्याचा दावा संपर्क प्रमुख सतीश हरडे यांनी केला. ऊन, वारा आणि पाऊस झेलत पक्षासाठी काम करणाऱ्या एकनिष्ठ शिवसैनिकांमुळेच शिवसेना टिकून असल्याचे त्यांनी सांगितले.
तर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याची सुरुवात नागपूरच्या भूमीतून होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे महानगर प्रमुख किशोर कुमेरिया यांनी नमूद केले. नागपुरात उद्धव ठाकरे यांचे होणारे स्वागत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यवतमाळ येथील सभेकडे आता विदर्भासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.