पुणे

उदयनिधी स्टॅलिन वादाच्या भोवऱ्यात

CD

जातिव्यवस्थेविरोधात बोललो,
श्रद्धेविरोधात नाही: उदयनिधी
चेन्नई, ता. १५ (पीटीआय) : सनातन धर्माबाबतच्या वक्तव्यामुळे पुन्हा वादात सापडलेले द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी आपण सनातन धर्म किंवा श्रद्धेबाबत नव्हे, तर समाजात उच्च-नीच भेद निर्माण करणारी जातिव्यवस्था संपुष्टात आणण्याबाबत बोललो होतो, असे स्पष्टीकरण दिले आहे.
तमिळनाडू विधानसभेतील भाषणानंतर त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, जातिव्यवस्था नष्ट करण्याचा अर्थ लोकांनी मंदिरात जाऊ नये असा नाही. प्रत्येकाला मंदिरात तसेच समाजात समान हक्क मिळावेत, हा त्यामागील उद्देश आहे. विधानसभेत समाजाला विभागणारी जातिव्यवस्था नष्ट झाली पाहिजे असे म्हटले. काही जण त्यावर टीका करत आहेत. मात्र, विरोधातूनच द्रविड चळवळ उभी राहिली आहे. असे त्यांनी नमूद केले. उदयनिधी यांनी आपण पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा आणि करुणानिधी यांच्या विचारांवर बोललो असल्याचे सांगितले. आम्ही कोणाच्याही देवावरील श्रद्धेविरोधात नाही; पण विषमता आणि दडपशाहीला ठाम विरोध करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेत मंगळवारी विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी सनातन धर्म समाजात भेदाभेद निर्माण करतो असा आरोप करत तो संपविण्याची गरज असल्याचे म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT