UGC appointed committee of experts to develop the Swayam App 
पुणे

'स्वयं' अॅप'च्या विकासासाठी यूजीसीने नेमली तज्ज्ञांची समिती;- डाॅ. नितीन करमळकर यांचाही समावेश

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'स्वयं' अॅपमध्ये पारंपारीक अभ्यासक्रमांसह इतर गोष्टींचा समावेश करून त्याचा आणखी विकास कसा होईल यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने १२ तज्ज्ञांची समिती नेमली आहे. ही समिती १५ दिवसात युजीसीला अहवाल सादर करणार आहे. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा समावेश आहे.
 
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
'कोरोना'मुळे ऑनलाईन अध्यापनास महत्व आले आहे. बहुतांश महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये प्राध्यापक व विद्यार्थी रोज संपर्कात असून, उर्वरीत अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे. 'स्वयं' हे शासनाने अॅप आहे. त्यात इयत्ता ९वी ते पदव्युत्तर पर्यंतच्या सुमारे २ हजार अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यामध्ये टेक्निकल अभ्यासक्रमांना महत्व आहे. 'स्वयं'च्या माध्यामातून अभ्यास करणाऱ्यांना क्रेडीट पॉइंट दिले जातात. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना अंतिम निकालात होतो. मात्र, विद्यापीठांकडून चालविले जाणारे बीए, बीएससी, बीकॉम या पारंपरिक अभ्यासक्रमांशी संबंधीत इतर कोर्स 'स्वयं'मध्ये नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा तिकडे कमी आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांचा काही भाग'स्वयं'मध्ये समाविष्ट केल्यास व त्यास क्रेडीट सिस्टीमने गुण दिल्यास ते गुण विद्यापीठ ग्राह्य धरू शकेल. या दृष्टीने बदल करने गरजेचे आहे. यातील त्रुटी दूर करून नव्याने अभ्यासक्रमांचा समावेश करण्यासाठी योग्य आराखडा तयार करण्याचा निर्णय यूजीसीने घेतला आहे. 

- "राज्यावर आता दुसरं संकट", फेसबुक लाईव्हमध्ये काय म्हणालेत शरद पवार...
सीईसीचे अध्यक्ष जे. बी. नड्डा हे या समितीचे अध्यक्ष अाहेत. इनफ्लीब्लेन्टचे संचालक जे. पी. सिंग ज्योरेल,  हैद्राबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा पोडीले,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीम करमळकर यांच्यासह देशातील प्रमुख शैक्षणिक संस्था, विद्यापीठांचे कुलगुरू, तज्ञ असे ११ जण या समितीचे सदस्य आहेत. ही समिती पुढील पंधरा दिवसात सादर केला जाणार आहे. 

देशात तीन मे पर्यंत 'या' 13 सेवा राहणार बंद...
"स्वयं'मध्ये अनेक कोर्स आहेत, पण त्यात टेक्निकल कार्सची संख्या जास्त आहे. त्यामुळे यात काही बदल केले तर विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल का यासाठी प्रयत्न आहेत.  पारंपरिक अभ्यासक्रमांसंदर्भात काही कोर्स सुरू केले तर, त्यांना तेथून ही शिक्षण घेता येईल याचाही विचार यात होणे आवश्यक आहे."
- डाॅ. नितीन करमळकर, समिती सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT