पुणे

सोलापूर- उजनीतील डेटा सेंटरप्रश्नी जनसुनावणी घ्या, अन्यथा लढा तीव्र करू

CD

‘उजनी’तील डेटा सेंटरप्रश्नी
जनसुनावणी घ्यावी

अन्यथा लढा तीव्र करू; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा इशारा

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकलूज : उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित डेटा सेंटर प्रकल्पामुळे शेतीच्या पाणीवाटपावर होणारी कपात, जलप्रदूषण, मच्छीमारी व्यवसाय आणि जैवविविधतेवरील परिणाम अशा २२ प्रमुख मुद्द्यांवर शासनाने तातडीने उत्तरे द्यावीत. तसेच, या प्रकल्पातील सर्व बाधित घटकांची जनसुनावणी घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलनासह मशाल मोर्चा काढण्यात येईल, असा थेट इशारा खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिला आहे.
उजनीतील प्रस्तावित प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर अकलूज येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार मोहिते-पाटील बोलत होते. या वेळी त्यांनी शासन व प्रशासनाशी केलेल्या पत्रव्यवहाराचे सादरीकरण केले.
ते म्हणाले, ‘‘स्थानिक भूमिपुत्र, मूळ जमीनधारक आणि मच्छीमार बांधवांच्या शंकांसह एकूण २२ प्रश्नांवर मुख्यमंत्री, मुख्य सचिव, कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र, त्यावर अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर दिलेले नसून, केवळ कृष्णा खोरे महामंडळाच्या कनिष्ठ अभियंत्याने उत्तर दिले आहे. सामंजस्य करारातून अणुऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्प वगळल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी तोंडी सांगितले असले, तरी त्याबाबतचा शासकीय अध्यादेश किंवा पत्र सोलापूरकरांसाठी खुले करावे.’’
जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची केळी आणि डाळिंबाचे उत्पादन होते. शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध असल्याने येथे डेटा सेंटरऐवजी कृषी प्रक्रिया उद्योग उभारल्यास सोलापूरकर आणि शेतकरी त्याचे नक्कीच स्वागत करतील, असे मत खासदार मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.


नामदेव पायरीसमोर चर्चेचे आव्हान
प्रकल्पातून नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या २८०० नोकऱ्या निर्माण होणार आहेत, याचा ठोस कृती आराखडा प्रशासन देत नाही. आम्हाला मोघम उत्तरे नकोत. प्रकल्पसमर्थकांनी या २२ प्रश्नांची शास्त्रीय माहितीसह उत्तरे घेऊन पंढरपूरच्या नामदेव पायरीसमोर समोरासमोर चर्चेसाठी यावे, असे खुले आव्हानही त्यांनी या वेळी दिले. जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत या २२ प्रश्नांची माहिती पोहोचवली जात असून, ग्रामस्थांनी भविष्याचा विचार करून भूमिका घ्यावी, असे आवाहन करत हा मुद्दा संसदेच्या आगामी अधिवेशनात शून्य प्रहरात लावून धरण्याची ग्वाही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईतून कोकणात थेट १ तासात पोहोचणार, नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू; तिकीट दर किती?

पुण्याच्या एअर हॉस्टेसची गोंदियाच्या जंगलात हत्या, सोबतच्या व्यक्तीचं सोनं अन् पैसे लुटले; काय घडलं?

Latest Marathi News Update : राज्यात दुष्काळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर दोन राज्यातील मेंढपाळांमध्ये मोठा तणाव

Uran Fire: उरणमध्ये अग्नितांडव, गोदामात प्रचंड स्फोट; हवेत धुराचे लोट, नागरिकांना श्वास घेण्यास त्रास

Success Story:"आजचा दिवस तुझा नाही उद्या नक्की पास होशील" वडिलांच्या शब्दांनी दिली प्रेरणा; 34 वेळा नापास, 35व्या प्रयत्नात बनले अधिकारी!

SCROLL FOR NEXT