बारामती, ता. २ : उजनी धरणात एआय डेटा सेंटर प्रकल्प आला म्हणजे पाणी गेले असे नाही, पाण्याचा वापर जपून व्हायला हवा इतकेच. मी तिथे जाईन, लोकांचा विरोध का आहे हे समजून घेईन आणि यात काही बदल करण्याची गरज असल्यास त्याबाबतही विचार होईल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नमूद केले.
गोविंद बाग (बारामती) येथे रविवारी (ता. १) माध्यमांशी पवार बोलत होते. ते म्हणाले की, नवी दिल्लीत विरोधी पक्षाच्या नेत्यांना आंदोलनासाठी एकत्र येण्याचे कारण म्हणजे केंद्राने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या बाबतीत योग्य वेळी निर्णय घेतला नाही. असे असले तरी आपण मात्र राज्यातील टंचाईच्या स्थितीतून राज्याला सावरण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील टंचाईच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशीही संवाद साधणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दिल्लीतील आंदोलनामध्ये राष्ट्रवादीच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे सहभागी होत असून मी राज्यातील संकटात सापडलेल्या बळिराजाच्या अडचणी समजून घेणार आहे. पिण्याचे पाणी व जनावरांना चारा या दोन महत्त्वाच्या बाबींवर लक्ष देणार असल्याचे पवार यांनी नमूद केले.
पवार कुटुंबीयांची दिवाळी यंदा नाही
राज्यभरातून दिवाळीला पवार कुटुंबीयांना भेटायला लोक येतात मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नाही, असे शरद पवार यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.