पुणे

‘उजनी’चा भीमा नदीतील विसर्ग बंद

CD

नीरा नरसिंहपूर, ता. ५ : उजनी धरणातून भीमा नदीत पिण्यासाठी सोडलेले पाणी गुरुवारी (ता. ५) बंद केले आहे. सध्या धरणात ६५ टक्के पाणी शिल्लक असून पुढील काळासाठी पिण्यासाठीच प्राधान्याने राखीव ठेवण्यात आलेले आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
उजनी धरणातून भीमा नदी मार्गे सोडलेले पाणी हरळी बंधाऱ्यात पोहोचतात प्रशासनाने उजनीतून सोडण्यात येणारा पाच हजार क्युसेक विसर्ग बंद केला आहे तर भीमा नदीवरील बंधाऱ्यांना ढापे टाकून काहीअंशी पाणी आडवण्यात आल्यामुळे दोन महिने तरी किमान पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. महावितरणाच्या वतीने नदी काठावरील विद्युत मोटारींसाठी दोन तास थ्री फेज वीजपुरवठा करण्याचा कडक आदेश दिलेला आहे. शेतकरी नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आव्हानही करण्यात आलेले आहे.
दरम्यान, मागील वर्षी या दिवसांमध्ये उजनी धरण १०० टक्के भरलेले होते. गतवर्षी उपयुक्त पाणीसाठा ५३ टीएमसी होते तर तोच पाणीसाठा आता ३६ टीएमसी उरलेला आहे. त्यामुळे आगामी वर्षभर शिल्लक असणारे पाणी पिण्यासाठीच प्राधान्यांनी ठेवण्याची कसरत शासन व प्रशासनाला करावी लागणार आहे.
भीमा नदी काठावरील तालुक्यातील गावांना पिण्याचे पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून शेतकऱ्यांनी पिण्यासाठी प्राधान्य द्यावी, अशी ही सूचना करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

Kumbhephal Accident: कुंभेफळ उड्डाणपुलावर काळाचा घाला! भरधाव चारचाकीच्या धडकेत १३ वर्षीय एकुलत्या एक गौरवचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Ambegaon News: आंबेगावकरांना दिलासा! पाणी-चारा टंचाई निवारणासाठी जून २०२७ पर्यंतचा आराखडा तयार; ६५ टँकरची तयारी

Latest Marathi News Live Update : भाजपच्या पदयात्रेमुळे नागपूर ठप्प; दिवाळी खरेदीसाठी निघालेल्या नागरिकांची कोंडी

SCROLL FOR NEXT