ujani dam water electricity project sakal
पुणे

उजनीवरील जलविद्युत प्रकल्प सुरू, कालव्याचे पाणी वाढविले

उजनी धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला असून, जलविद्युत प्रकल्पासाठी धरणातून १६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

सचिन लोंढे

उजनी धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला असून, जलविद्युत प्रकल्पासाठी धरणातून १६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

कळस - उजनी धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला असून, जलविद्युत प्रकल्पासाठी धरणातून १६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. याशिवाय मुख्य कालव्याचे पाणी वाढविण्यात आले असून, काल पाचशे क्युसेकने सुरू केलेल्या कालव्याचे पाणी वाढवून आता दिड हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणातील पाणी पातळी शंभर टक्क्यांच्या उंबरट्यावर येवून ठेपल्याने धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.

पुण्यात पडणाऱ्या पावसामुळे धरणात २३ हजार क्युसेक्सहून अधिक प्रमाणात पाणी येत असल्याने धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. सध्या धरणात ९६ टक्क्यांहून अधिक पाणी साठा झाला आहे. शिवाय धरणात येणारा पाण्याचा प्रवाह कायम आहे. यामुळे धरणातून विज निर्मिती प्रकल्पाबरोबर सिना-माढा जोड कालवा व मुख्य कालव्याला पाणी सोडण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.

सध्या पाऊस बंद झाला आहे. यामुळे नदीत पाणी सोडण्याचा निर्णय अद्यापर्यंत झाला नसला, तरी वीज निर्मिती प्रकल्पाचे पाणी नदीत जात असल्याचे उजनी धरणाचे कार्यकारी अभियंता राबसाहेब मोरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान येथील वीज निर्मिती प्रकल्पाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उजनी वीज निर्मिती प्रकल्प, मंजुनाथ बगाडे म्हणाले, आज सकाळी अकरा वाजता वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पातून प्रतितास १२ हजार ५०० युनिट वीज निर्मिती केली जात असून, दिवसाकाठी ३ लाख युनिट वीज निर्मिती केली जात आहे. सदर वीज इंदापूर येथील १३२ केव्ही वीज उपकेंद्रास दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT