ujani dam
ujani dam 
पुणे

उजनी धरण भरण्याच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा

भीमा नदीकाठच्या 45 गावांना सावधानतेचा इशारा 

इंदापूर : पुणे जिल्ह्यातील धरणांतून सोडण्यात आलेले पाणी "उजनी'त वेगाने येत असून त्यामुळे उद्या (ता. 7) धरण शंभर टक्के भरण्याची चिन्हे आहेत. धरणात मंगळवारी एकूण 114.76 टीएमसी (95. 39 टक्के) पाणीसाठा झाला होता. भीमा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पुणे जिल्ह्यातील धरणांचे पाणी मंगळवारी (ता. 6) सायंकाळी भीमा नदीत 2 लाख 94 हजार 431 क्‍युसेक वेगाने येत होते. त्यामुळे उद्या (ता. 7) उजनी शंभर टक्के भरण्याची चिन्हे आहेत. उजनीतून सध्या नदीत 1 लाख 51 हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. वीजनिर्मितीसाठी 1600 क्‍युसेक, कालव्यातून 2500 क्‍युसेक; तर बोगद्यातून 1200 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

उजनी धरणाच्या यशवंत जलाशयाची पाणी साठवणक्षमता 123 टीएमसी असून, धरणातील पाणीपातळी 115 टीएमसीपर्यंत स्थिर ठेवण्याचा धरण व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. धरणातील वाढत्या विसर्गामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भिगवण ते हिंगणगाव, कांदलगाव टप्प्यातील नदीकाठचे वीजपंप सुरक्षितस्थळी नेण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पुण्याच्या राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, दुर्गम भागात ओढ्यांना पूर

Ujni Boat Accident: उजनी धरणातील 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले, नातेवाईकांचा एकच आक्रोश

मेंदु खाणाऱ्या अमिबाने घेतला ५ वर्षीय मुलीचा जीव, जाणून घ्या Naegleria Fowleri बद्दल सविस्तर

Priyanka chopra: 2,800 तासांची मेहनत अन् 140 वर्षांचा इतिहास; देसी गर्ल प्रियांकानं परिधान केलेल्या खास नेकलेसची किंमत माहितीये?

Virat Kohli : कोहलीला संघात न घेण्यासाठी भारतात कारणे का शोधतात? विराटसाठी दिग्गज खेळाडूची ‘बॅटिंग’

SCROLL FOR NEXT