CKL26B03192
करमाळा ः वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी करमाळा तहसील कार्यालयात निवेदन देताना उजनी लाभक्षेत्रातील शेतकरी.
उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा रास्ता रोकोचा इशारा
चिखलठाण, ता. १२ : करमाळा तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा अनियमित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास १८ सष्टेबरला रास्ता रोको करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
करमाळा तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रातील गावांना सध्या सुरळीत वीजपुरवठा होत नाही. लोडशेडिंगच्या नावाखाली वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. दिवसातून आठ तासांऐवजी केवळ दोन ते चार तासच वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पिके वाळून चालली असून केळीच्या बागाही सुकत आहेत.
सध्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने पिकांना उजनी जलाशयातून पाणी देण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. उजनी जलाशयात शंभर टक्के पाणीसाठा असतानाही वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. उभी पिके जळून चालली असून, याला जबाबदार कोण, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. केवळ धरणग्रस्त शेतकऱ्यांवरच लोडशेडिंग लादून अन्याय केला जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
करमाळा तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रातील सर्व गावांना दिवसातून आठ तासांचा हक्काचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सात दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास १८ रोजी जेऊर येथील महावितरण कार्यालयासमोर अहिल्यानगर-टेंभुर्णी महामार्गावर शांततेत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.