पुणे

आटत्या तलावात पक्ष्यांचा मेजवानी सोहळा

CD

कळस, ता. ५ : उजनी जलाशयात यंदा मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने, पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या हिवाळी पाहुण्यांनी आपला मोर्चा लगतच्या छोट्या-मोठ्या पाझर तलावांकडे वळविला आहे. पावसाळ्यात ओसंडून वाहणारे हे तलाव आता उन्हाच्या झळांनी आटू लागल्याने, तिथे तयार झालेल्या दलदलीत आणि उथळ पाण्यात पाणपक्ष्यांचे थवे मोठ्या संख्येने खाद्यान्न मिळविण्यासाठी उतरत असल्याचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळत आहे. तलावाच्या डोहातील मासे, जलचर किटक, शेवाळे यांसारख्या खाद्यान्नावर ताव मारणाऱ्या या पक्षांचे दृश्य पाहिल्यानंतर हे तलाव पक्षांचे ‘फूड कोर्ट’ बनल्याचा प्रत्यय येत आहे. कळस (ता. इंदापूर) येथील आटलेल्या पाझर तलावावर खाद्यान्नासाठी दररोज उतरत असलेला चित्रबलाक पक्षांचा थवा स्थानिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे.

दरवर्षी हिवाळ्यात उजनीच्या विस्तीर्ण जलाशयावर शेकडो प्रजातीचे पक्षी मोठ्या संख्येने आढळून येतात. यामध्ये प्रामुख्याने पट्टकादंब, कुदळ्या, कैकर, गोगलफोड्या, भोरड्या, ब्राम्हणी बदक, किरकिरा, राखी बगळा, चित्रबलाक, ससाणा, हळदी-कुंकू बदक, तलवार बदक, थापट्या, स्पूनबील, पाणकावळे, नंदीमुख, वकील यांसारख्या पक्षांचा समावेश असतो. यंदा अद्यापपर्यंत फ्लेमिंगो पक्षांनी येथे हजेरी लावली नसली तरी इतर पाणपक्षांनी दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे.
सध्या उजनी धरणातील पाणी साठा ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यामुळे पाणलोट क्षेत्रात अद्याप दलदलीची ठिकाणं तयार झालेली नाहीत. आजपासून धरणातून नदीत पाणी सोडण्यास सुरवात केली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत धरणातील पाण्यात घट होऊन, दलदलीची ठिकाणं तयार होण्यास मदत होईल. परंतु सध्या पाणलोटक्षेत्रात दाखल झालेल्या पक्षांनी परिसरातील छोट्या-मोठ्या तलावांवरील डोहांवर हजेरी लावत मेजवानीवर ताव मारल्याचे दिसून येत आहे.
तलावातील डोहांमध्ये विशेषतः चित्रबलाक, बगळे, बदक, सुरई, शेकाट्या यांसारखे पक्षी मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावावर विणीच्या हंगामासाठी घरटी थाटलेले चित्रबलाक पक्षी, परिसरातील तलावांवर खाद्यान्नासाठी हजेरी लावत आहेत. तलावांमधील उथळ पाण्यात मासे, जलकीटक आणि शेवाळे पकडणे पक्ष्यांसाठी सोपे जात आहे. त्यामुळे उजनीच्या खोल पाण्यापेक्षा या ‘पाझर तलावांच्या’ काठावर सध्या पक्ष्यांची अधिक गर्दी दिसत आहे.
चित्रबलाक पक्षी आपली लांब चोच चिखलात फिरवत मासे शोधताना दिसतात. पांढरा शुभ्र रंग, पंखांवर व शेपटीच्या भागात काळ्या खुणा, पंखाच्या मागील बाजूस गुलाबी छटा, पिवळ्या रंगाची जाड व लांब बाकदार चोच, काळे व लांब पाय असल्याने सुमारे तीन फुटांपर्यंत उंची असलेल्या या देखण्या पक्षांना पाहून स्थानिकांना नवल वाटत आहे.

उजनी धरणात पाणी जास्त असेल तर पक्ष्यांना भक्ष मिळवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतात. अशा वेळी परिसरातील छोटे पाझर तलाव त्यांच्यासाठी वरदान ठरतात. उथळ पाणी आणि मुबलक खाद्य यामुळे पक्ष्यांचा वावर वाढला आहे, ही पर्यावरणाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. हे पाहुणे पक्षी आपल्या भागाची शोभा वाढवतात. मात्र, तलावातील पाणी आटत असताना या पक्ष्यांना कोणताही त्रास होणार नाही किंवा त्यांची शिकार होणार नाही, याची काळजी स्थानिकांनी घेणे गरजेचे आहे.
- दत्तात्रेय लांघी, पक्षी निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

'कमळी' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री; म्युझिक टिचर बनून येतेय सगळ्यांना वेड लावणारी गायिका, चाहते खुश

Yuvraj Singh: 'धोनी अचानक आला, भारताचा कॅप्टन झाला, त्यावेळी मी...', युवराजचं थेट भाष्य; निवृत्तीबाबतही केला धक्कादायक खुलासा

काळजाचा थरकाप! अचानक टायर फुटलं अन् होत्याचं नव्हतं झालं; ५ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत

पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात ऐतिहासिक कपात; नव्या किमती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT